विमलताई खताळ यांना शिंगोली - कोरवली भागात प्रचंड प्रतिसाद
कमळ चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन
युवा नेते अक्षय दादा खताळ यांचा कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक भेटीवर फोकसकुरुल (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार विमलताई तानाजीराजे खताळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने युवा नेते अक्षय दादा खताळ यांनी शिंगोली , तरटगाव, हराळवाडी , कोरवली या गावांचा गावभेट दौरा केला. या गावात मोठ्या उत्साहात व आनंदाने नागरिकांनी त्यांचे स्वागत केले असून त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे तर भारतीय जनता पार्टीचे व तालुक्यातील सर्व उमेदवाराचे कमळ चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून काम करावे असे आवाहन युवा नेते अक्षय दादा खताळ यांनी केले आहे.
या गावभेट दौऱ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी सुरू केलेल्या लोकहिताच्या योजनांची माहिती दिली.तर राज्याचे विकासप्रिय मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या,शेतकऱ्यांच्या , विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या सुरू केलेल्या अनेक योजनांची माहिती दिली.तर या गटात माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.तानाजीराजे खताळ यांनी अनेक विकासाच्या योजना आपल्या गावासाठी आणल्या आहेत.आणि या पुढील गावचा विकास हा पालकमंत्री ना.जयकुमार गोरे व आमचे नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत.असे अभिवचन ही यावेळी विमलताई खताळ यांनी नागरिकांना दिले.
चौकटपूर परिस्थितीमध्ये केलेल्या मदतीची आठवण करून दिली
या गावांना काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुराच्या फटका मोठ्या प्रमाणात बसला होता.अनेक लोक घरात अडकून पडले होते.अनेकजण शेतात अडकले होते.अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले.अनेकांची जनावरे पाण्यात वाहून गेली.घरातील धान्य , संसार उपयोगी वस्तू सर्वकाही पाण्यात गेले.अशा कठीण प्रसंगी मदत नव्हे आपले कर्तव्य आहे.ही भावना मनात ठेऊन खताळ परिवाराने नागरिकांसाठी मदतीचा हात दिला होता.याची आठवण या गावभेट दौऱ्यात अनेकांनी करून दिली.

0 Comments