नातेपुते पोलिसांची दबंग कारवाई, गावठी कट्टा पिस्तूल बाळगणा-या इसमास अटक
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील शिखर शिंगणापूर पाटी हॉटेल गोल्डन ईरा परिसरात गावठी कट्टा पिस्तूल बाळगणाऱ्या इसमास नातेपुते पोलिसांची दबंग कारवाई करून त्या इसमास पकडून एक गावठी कट्टा पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन जप्त करून पिस्तूल बाळगणारा आरोपी
गौरव पोपट होळकर (वय ३१ वर्षे) रा. १० फाटा, होळ, ता. बारामती, जि. पुणे यास नातेपुते पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुरू असून
२६ जानेवारी २०२६ रोजी रात्री नातेपुते पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रात्र गस्त घालत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्ती गावठी कट्टा पिस्तूल बाळगून फिरत असल्याची माहिती बातमीदार मार्फत हद्दीत गस्त घालत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली असता शिंगणापूर पाटी येथील हॉटेल गोल्डन ईरा परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास पकडण्यासाठी सापळा रचला व पहाटे ०१ : ३५ वाजण्याच्या सुमारास पिस्तूल बाळगणाऱ्या गौरव पोपट होळकर (वय ३१ वर्षे) यास घेराव घालून ताब्यात घेतले. व त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल मिळून आले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन जप्त करून पिस्तूल बाळगणारा आरोपी
गौरव पोपट होळकर (वय ३१ वर्षे) रा. १० फाटा, होळ, ता. बारामती, जि. पुणे यास नातेपुते पोलिसांनी दोन पंचांच्या साक्षीने ताब्यात घेतले. पोलीस ठाणेकडील पो.नाईक राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी , अप्पर पोलीस अधीक्षक श प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजने व नातेपुते पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विशेष पथकातील पोसई सोनल मोरे, पोलीस हवालदार राहुल रुपनवर, देविदास धोत्रे,पोलीस नाईक राकेश लोहार, पो.कॉ. रणजित मदने,पो.कॉ. रमेश बोराटे पो.कॉ. संतोष वारे व राहुल वाघमोडे गोरे यांनी विशेष मेहनत घेतली. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोफौ.सतीश पाटकुलकर हे करीत असून सदर अवैध शस्त्र कुठून आणले त्याचे कोण कोण साथीदार आहेत त्याबाबत पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आसल्याचे नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी सांगितले.
चौकटीत :
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. सर्वांनी कायद्याचे नियम पाळावे नागरिकांनी अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी एखादी संशयास्पद गोष्ट निदर्शनास आली असल्यास नागरिकांनी तात्काळ नातेपुते पोलीस ठाण्याची संपर्क साधावा
महारुद्र परजणे ( सपोनी नातेपुते पोलीस ठाणे )

0 Comments