Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते सन्मान

 टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते सन्मान




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास करून यशस्वी छडा लावल्याण्यास यश आल्या बद्दल टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आला .
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी पोलीस स्टेशन ठाण्यांतील गंभीर गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची निवड माननीय पोलीस अधीक्षक, सोलापूर यांनी ‘उत्कृष्ट तपास अधिकारी’ म्हणून केली होती. पोलीस निरीक्षक पवार यांनी मौजे अरण (ता. माढा) येथील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना अटक केली, भीमानगर येथील अनोळखी मृतदेह प्रकरणात मृताची ओळख पटवून सख्खा भाऊ व मावसभाऊ यांच्यासह आरोपींना अटक करण्यात आली, बेंबळे चौक येथे वृद्ध महिलेची फसवणूक करून लूट करणाऱ्या महिला व पुरुष आरोपींना अटक करून पुणे येथून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व फिर्यादी महिलेला तिचे दागिने परत देण्यात आले, तसेच टेंभुर्णी एसटी स्टँडवरील बस चोरी, घरफोडी, वाहन चोरी व गहाळ मोबाईल प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून महामार्गावरील प्राणघातक अपघात करून पळून गेलेल्या वाहनांचा शोध घेऊन आरोपी अटक करून मयतांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यात आल्या प्रकरणी आज 26 जानेवारी निमित्त सोलापूर येथे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्याबद्दल टेंभुर्णी शहरातील व परिसर नागरिकातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे
Reactions

Post a Comment

0 Comments