Hot Posts

6/recent/ticker-posts

बँक ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन

 बँक ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटना, पुणे युनिट यांच्या वतीने सोलापूर येथे सोलापूर झोनमधील बँक ऑफ इंडिया च्या अधिकाऱ्यांसाठी क्रिकेट, बॅडमिंटन व रसीखेच या क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये सोलापूर झोनमधील तब्बल २८५ अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कामाच्या दैनंदिन तणावातून मुक्ती मिळावी, वर्क-लाईफ बॅलन्स, परस्पर एकजूट व सौहार्द वाढावे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धांदरम्यान खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.

या कार्यक्रमास बँक ऑफ इंडिया अधिकारी संघटना, पुणे युनिटचे अध्यक्ष कॉ. अमोल सांगळे व सचिव कॉ. प्रमोद शिंदे उपस्थित होते. त्यांनी

आपल्या मनोगतात अशा उपक्रमांमुळे अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व संघटनात्मक बंध अधिक दृढ होतात, असे सांगितले. स्पर्धांचा समारोप बक्षीस वितरण समारंभाने झाला. सहभागी सर्व अधिकाऱ्यांचे व आयोजन समितीचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments