श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी हलव्याचे दागिने स्पर्धा उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेच्या वतीने महिलांसाठी हलव्याचे दागिने स्पर्धा आयोजित करण्यात आला होता. हा आठवा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला.
सोलापुरातील समाजकल्याण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल कॉलेज सब पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्टर योगिता क्षिरसागर, शहा व कुलकर्णी डेव्हलपर्सच्या संचालिका अमृता कुलकर्णी, किर्ती इंडस्ट्रीजच्या मॅनेजिंग डायरेक्टर आरती बेत, ऑड सुनिता नरोटे, संस्थेचे अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. या स्पर्धेत २१ ते ६५ वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कामिनी गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनरच्या कामिनी गांधी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
अध्यक्षीय मनोगतात पोस्टमास्टर योगिता क्षिरसागर यांनी महिलांनी स्वतःच्या संरक्षणाबाबत सजग राहावे, भारतीय संस्कृती जपत आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन केले. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान महिलांसाठी दरवर्षी विविध उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एकूण दहा उपक्रम घेण्यात येणार असून आतापर्यंत विद्यार्थी दत्तक योजना, सेनेटरी पॅड वितरण, स्टील पाणी टाकी स्थापन, अन्नदान, दिवाळी फराळ वाटप, चित्रकला स्पर्धा तसेच हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना चादर वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.या सर्व उपक्रमांची माहिती संस्थापक महेश कासट यांनी प्रास्ताविकातून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षता कासट यांनी मानले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिला तापडिया, सुजाता सक्करगी, रुपा कुत्ताते, शुभांगी लचके, आर्या लचके, भारती जवळे, नर्मदा कनकी, उमा मुंगड, श्रेया लचके, दिपक करकी, राजेश केकडे, अभिजीत व्हानकळस, सुरेश लकडे, श्रीरंग रेगोटी, श्रीरंग श्रीगन, सौरभ करमळकर, नरेश कनकी आदींनी परिश्रम घेतले.
चौकट : हलव्याचे दागिने स्पर्धेचा निकाल असा
प्रथम : कोमल सोनवणे – पैठणी
द्वितीय : प्रियंका जाधव – डिनर सेट
तृतीय : अमृता भोसले – कुकर
उत्तेजनार्थ : पुजा आंडगे – बांगडी बॉक्स.png)
0 Comments