Hot Posts

6/recent/ticker-posts

अनगरचे नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांचे पदभारभार स्वीकार

 अनगरचे नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांचे पदभारभार स्वीकार
मोहोळ (कटूसत्य वृत्त) – नव्याने स्थापन झालेल्या अनगर नगरपंचायतीत प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. लोकनेते परिवारावर विश्वास ठेवलेल्या मतदारांचे आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. उपनगराध्यक्षपदी श्रीकांत जगन्नाथ घाटुळे निवडले गेले, तर स्वीकृत नगरसेवक अॅड. रवींद्र वसंत पाटील आणि अजित सत्यवान बोडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
पदभार स्वीकारल्यानंतर नूतन नगराध्यक्षासह नगरसेवकांना मुख्याधिकारी सुरेश भदर यांनी वृक्ष लागवडीचा संदेश देत झाडांची रोपे वितरित केली. निवडणूक सोहळा साध्या, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
याप्रसंगी नगरसेवक नारायण गुंड, काजल मोरे, विशाल थिटे, उमेश भडकवाड, श्रीकांत घाटुळे, विजया कोकरे, सीमा गुंड, वैशाली पाचपुंड, रमेश गुंड, विठ्ठल कारंडे, सुरेखा डिकोळे, विद्या शिंदे, विक्रम गुंड, शीतल गायकवाड, रूपाली शिंदे, जुलेखा मुलाणी, तसेच मुख्याधिकारी सुरेश भदर व कर्मचारी उपस्थित होते.अनेक मान्यवर उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments