सोलापूर (कटूसत्य वृत्त) – प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनंत जाधव, वंदना गायकवाड, विनायक विटकर आणि ऐश्वर्या साखरे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या कॉर्नर सभांमध्ये प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. यावेळी नरेंद्र पाटील यांनी सभेत भाषण करत विरोधकांवर टिका केली.
सभेत उपस्थित नागरिकांमध्ये युवा वर्ग आणि महिला विशेषतः लक्षवेधी होते. नागरिकांनी उमेदवारांना निवडून देऊन प्रभागातील समस्यांचे निराकरण व्हावे, असे आवाहन केले. याशिवाय, मतदानाचा हक्क बजावण्याचे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
उमेदवारांनी प्रभागातील लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. नागरिकांनी प्रश्न मांडणारा आणि त्यांच्या अडचणी सोडवणारा उमेदवार निवडावा, तरच प्रभागातील समस्यांचे प्रभावी निराकरण होईल, असे नरेंद्र पाटील यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

0 Comments