Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये सहकार महर्षि जयंती साजरी

 सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये सहकार महर्षि जयंती साजरी




अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलूज व विविध संस्थांचे वतीने कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि कै. शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील यांच्या १०८ व्या जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त  विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री-महाराष्ट्र राज्य, चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील व मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील, सभापती-कृषी उत्पन्न बाजार समिती, अकलूज व त्यांचे सर्व कुटूंबीय तसेच कारखाना व विविध संस्थाचे पदाधिकारी, खातेप्रमुख व कामगार यांनी सहकार महर्षि काकासाहेब यांचे समाधीचे दर्शन घेऊन विनम्र अभिवादन केले.

तसेच सहकार महर्षि कारखाना मुख्य कार्यालयाचे समोरील संस्थापक सहकार महर्षि काकासाहेब यांचे पुर्णाकृती पुतळ्यास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख व पदाधिकारी तसेच मान्यवरांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि यांचे जयंतीनिमित्त या कालावधीत वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात.

सदर कार्यक्रमाकरिता कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, ॲड.विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, डॉ. सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक-ॲड.प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, माजी संचालक सुरेश मेहेर, महादेव घाडगे, विजय हेगडे, राजेंद्र मोहिते, चांगदेव घोगरे, रामचंद्र चव्हाण, मोहनराव लोंढे, महादेवराव चव्हाण, सुभाष पताळे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, दत्तात्रय चव्हाण, धनंजय सावंत, अनिलराव कोकाटे, सौ.हर्षाली निंबाळकर तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, कार्यलक्षी कामगार संचालक जयवंत माने देशमुख व विविध संस्थाचे पदाधीकारी खातेप्रमुख, अधिकारी, कामगार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments