Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग क्र. ७ मध्ये शिवसेना उमेदवारांचा जोरदार होम-टू-होम प्रचार

 प्रभाग क्र. ७ मध्ये शिवसेना उमेदवारांचा जोरदार होम-टू-होम प्रचार




नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विकासाच्या मुद्द्यांवर साधला संवाद

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ७ मध्ये शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला असून, विविध भागांत होम टू होम प्रचार मोहीम राबविण्यात आली. या प्रचार मोहिमेला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

प्रभाग क्र. ७ मधून शिवसेनेचे उमेदवार,अ) श्री. अनिकेत (दादा) शिवाजीराव पिसे, ब) सौ. मनिष (ताई) विशाल कणसे, क) सौ. मनोरमा (ताई) ज्ञानेश्वर सपाटे, ड) श्री. अमोल (बापू) बाळासाहेब शिंदे
यांनी एकत्रितपणे परिसरातील नागरिकांशी थेट संपर्क साधत विकासाचा संदेश पोहोचवला.

ही होम टू होम प्रचार मोहीम **कृष्ण मंदिर परिसर, लोणार गल्ली, शिव मंदिर परिसर, सळई मारुती मंदिर परिसर, गवंडी गल्ली तसेच सिद्धेश्वर तालीम परिसर** या भागांत राबविण्यात आली. उमेदवारांनी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या मुद्द्यांवर नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना पक्षाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.

प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी व युवकांनी उमेदवारांशी संवाद साधत आपल्या अपेक्षा मांडल्या. “स्थानिक प्रश्नांची जाण असलेले आणि सतत जनतेत राहणारे प्रतिनिधी हवेत,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

या होम टू होम प्रचारामुळे प्रभाग क्र. ७ मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments