स्वतः च्या क्षमता ओळखून विकसित करा - रवींद्र येवले
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- जीवन संघर्षमय आहे. आयुष्यात अनेक संधी येतील. त्या संधीचे सोने करा.आयुष्यात येणाऱ्या संकटाचा न डगमगता सामना करा.परिस्थिती वर मात करा. विद्यार्थी जीवनात भरपूर अभ्यास करा.चिकाटी, जिद्द, परिश्रम या गुणांचा अंगिकार करा.ताणतणावाचे समायोजन करा. थोरा मोठ्यांची चरित्रे अनुकरण करा.शाळेने तुमच्यावर केलेले संस्कार आयुष्य भर जतन करा.. अपयशाने खचू नका.आनंदी रहा, नम्र रहा.तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा.स्वतः च्या क्षमता ओळखून त्या विकसित करा.असे प्रतिपादन मुधोजी कॉलेज, फलटण चे माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी केले.
अक्षय शिक्षण संस्था संचलित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व जुनिअर कॉलेज, नातेपुते. येथे स्वामी विवेकानंद क्रीडा स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी त्यांनी विज्ञान प्रदर्शन व कलादालन चे उदघाटन करून विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्यातील जिज्ञासा वाढवली व त्यांचे कौतुकही केले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त अभिजित घुगऱदरे, डॉ. नरेंद्र कवितके, नंदकिशोर धालपे, मुख्याध्यापिका स्मिता आवळे, सुनील गोरे,पोपट रुपनवर व इतर मान्यवर उपस्थित होते.
समारंभाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका स्मिता आवळे यांनी केले. क्रीडा अहवाल वाचन सिकंदर मुलाणी यांनी केले.क्रीडा बक्षिस वितरण वाचन विशाखा केंगार, छाया वाघमोडे यांनी केले. ध्यान व ओंकार सादरीकरण अलका दीक्षित यांनी केले.समारंभाचे सूत्रसंचालन सुखदेव वलेकर, तर आभार प्रदर्शन पांडुरंग कुचेकर यांनी केले.
समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0 Comments