Hot Posts

6/recent/ticker-posts

राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

 राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात



 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत भारत स्काऊट गाईडच्या खरी कमाई उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उदघाटन नेताजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार,  शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी,  पालक शिक्षक संघाचे सदस्य शिवहार गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रथम स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या बाल आनंद मेळाव्यात ९० स्टॉल मांडण्यात आले होते. पाचवी ते सातवीच्या १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले. मेळाव्यात पुरी भाजी, समोसा, ढोकळा, कचोरी, गुलाबजाम, वडापाव, डबल का मीठा, पावभाजी, रसना, मिल्क शेक, कोबी मंचूरियन, भेळ , मसाला दूध, असे विविध रुचकर पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवून विक्री केले. मेथी, कोथिंबीर, शेपू, पुदिना, वांगी बटाटे, काकडी, गाजर, मिरची, लिंबू असे विविध पालेभाज्या विक्रीसाठी ठेवले होते. मेळाव्यातून वीस हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.या बाल मेळाव्यात विद्यार्थ्यांनी आनंद घेतले. विद्यार्थ्यांना व्यवहार कसा करावा, पैशाचे देवाण-घेवाण कसे करावे, उद्योग काय असतो, पदार्थ कसे बनवावे? खरी कमाई कशी असते,कष्टाचे फळ कशी मिळते या सर्व गोष्टींची माहिती होण्यासाठी समजण्यासाठी बाल आनंद मेळावा घेतल्याचे मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी सांगितले. स्काऊटर  हणमंत कुरे, गाईडर वैशाली गुजर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षेकेत्तर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments