Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत माकपचे प्रथमच उमेदवार रिंगणात

 जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत माकपचे प्रथमच उमेदवार रिंगणात



 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) आपले उमेदवार रिंगणात उतरवत आहे. या निवडणुकीत पंचायत समितीसाठी पाच तर जिल्हा परिषदेसाठी एक उमेदवार उभे करण्यात आले आहेत.

कुंभारी, धोत्री, सांगोला, मंद्रूप, चपळगाव या भागांमध्ये माकपचा संघटित प्रभाव असून, स्थानिक शेतकरी व मतदारांच्या सक्रिय सहकार्याच्या जोरावर पक्षाचे उमेदवार विजय मिळवतील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः रे नगर, गोदूताई परुळेकर नगर, कुंभारी व लगतच्या परिसरात पक्षाची मजबूत पकड आहे.

जिल्हा परिषदेसाठी कुंभारी मतदारसंघातून कु. प्रियांका दोंतुल या उमेदवार रिंगणात आहेत. येत्या 8 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह सोहळा असला तरी, त्या कॉ. नरसय्या आडम मास्तर यांचे जुने सहकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या कुटुंबातून असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली आहे.

पंचायत समिती धोत्री गण मधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या राज्य समिती सदस्या, तडफदार व उच्च शिक्षित तरुणी अश्विनी आडम या उमेदवार आहेत.
तर कुंभारी गणातून नितीन यादगिरी, योगेश अकीम,मंद्रूप येथून यासीन मकानदार, आणि सांगोला चोपडी गणातून अतुल फसाले, चपळगाव गण राजेंद्र स्वामी मधून हे उमेदवार पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

बुधवारी सकाळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव कॉ युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.यावेळी पक्षाचे राज्य समिती सदस्य ॲड अनिल वासम,विल्यम ससाणे, बापू साबळे,वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत ही निवडणूक लढवली जात असल्याचे माकपच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments