मनपा निवडणूक : उमेदवारांच्या बँक स्टेटमेंटसह खर्चाची प्रथम तपासणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 9, 2026

मनपा निवडणूक : उमेदवारांच्या बँक स्टेटमेंटसह खर्चाची प्रथम तपासणी

 मनपा निवडणूक : उमेदवारांच्या बँक स्टेटमेंटसह खर्चाची प्रथम तपासणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च समितीच्या वतीने गुरुवारी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथे उमेदवार खर्चाची प्रथम तपासणी व ताळमेळ सत्र यशस्वीरीत्या पार पडले. या विशेष कॅम्पमध्ये उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाचा सविस्तर तपशील तसेच संबंधित बँक खात्यांच्या स्टेटमेंटची तपासणी करण्यात आली.

मुख्य लेखाधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. रत्न राज जवळगेकर व सहनोडल अधिकारी सदानंद वाघमोडे यांनी उमेदवारांना खर्च नोंदवही भरण्याची योग्य पद्धत, खर्चाचे वर्गीकरण, पावत्या व बिलांचे जतन, बँक स्टेटमेंटशी ताळमेळ साधणे तसेच खर्च मर्यादेचे काटेकोर पालन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. निवडणूक खर्च वेळेत व अचूकपणे सादर न केल्यास नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक उमेदवाराने निवडणूक खर्चाची स्वतंत्र नोंद ठेवणे, खर्च नोंदवही अद्ययावत ठेवणे तसेच सर्व खर्च अधिकृत बँक खात्यातूनच करणे बंधनकारक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या तपासणी सत्राला विविध प्रभागांतील उमेदवार व त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच जयंत क्षीरसागर, अमर काळे यांच्यासह निवडणूक खर्च समितीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दुसरी खर्च तपासणी १२ जानेवारी रोज.महापालिका निवडणूक खर्च समितीच्या वतीने उमेदवारांची दुसरी खर्च तपासणी कॅम्प सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या कॅम्पमुळे खर्च सादरीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ होऊन निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यास मदत होत असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages