सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सुनील पुजारी - अखिल भारतीय साने गुरुजी अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबईकडून स्व. आप्पासाहेब गुंडोजी पाटील पाटील व स्व. सुमन भाऊसाहेब सुमन का साहेब पाटील स्मृतीपित्यार्थ ग्रंथ मित्र श्री गुलाबराव आप्पासाहेब पाटील पुरस्कृत राष्ट्रीय बालसेवा पुरस्कार श्री. सुरेश शामराव ठाकूर पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, ग्रंथ भेट, अकरा हजारचे चेक, राष्ट्रीय उत्कृष्ट कथा निवेदक पुरस्कार कै.सौ. विमल बाबुराव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री बाबुराव पाटील यांच्याकडून पुरस्कृत श्री रमेश पांडुरंग तांबे सत्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, ग्रंथ भेट, 5000 रुपयाचे चेक, राष्ट्रीय उत्कृष्ट शाखा पुरस्कार स्व. श्रीमती तानुबाई विठ्ठल पाटील नेर्ले यांच्या स्मरणार्थ श्री लालासाहेब विठ्ठल पाटील यांच्याकडून पुरस्कृत गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला गोवा सत्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, ग्रंथ भेट, 5000 रुपयाचे चेक, स्वातंत्र्य सेनानी प्रकाश भाई मोहाडीकर राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार श्री सुरेश निवृत्ती टेकाळे, मुख्याध्यापक बाही नारायणराव लोमटे हायस्कूल भाटशिरपुरा कळंब धाराशिव, श्री ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील मुख्याध्यापक हुतात्मा बाबुराव बोरगावकर विद्यालय बोरगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव, श्री प्रवीण महादेव गुरव शिक्षक महात्मा गांधी विद्यालय वडगाव काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव, श्री नितीन गोविंद पाटील शिक्षक साने गुरुजी विद्यालय कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर , सौ शशिकला मल्लय्या स्वामी-मठपती शिक्षिका राजवर्धन विद्यालय शेळगी सोलापूर, सो मनीषा सुभाराव इंगोले-गठ्डे, श्रीमती मंगल लक्ष्मण आघार्डे शिक्षिका साने गुरुजी विद्यालय कन्नड छत्रपती संभाजी नगर, सौ आशा सुनील पाटील शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अमोंड तालुका आंबेगाव, सौ मनीषा बाळासाहेब घोडे शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंजाळवाडी तालुका शिरूर, सत्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, ग्रंथ भेट, 500 रोख रक्कम राष्ट्रीय संस्कार दूध पुरस्कार प्रथम श्री हसन देसाई कोल्हापूर, द्वितीय श्री गोरख ढगे चाळीसगाव, तृतीय डॉ. गिरीष कुलकर्णी कळंब जिल्हा धाराशिव सत्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह सन्मानपत्र ग्रंथ भेट , पाच हजार, तीन हजार,दोन हजार अशा प्रकारे पुरस्कार असतील. बेळगाव येथील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन ओरिएंटल इंग्लिश स्कूल, विद्या संकुल इंद्रप्रस्थ नगर, टिळकवाडी बेळगाव कर्नाटक येथे थोर शिक्षण तज्ञ श्रीमती सरोज पाटील जागतिक भाषा तज्ञ डॉक्टर गणेश देवी, आय आर एस अप्पर आयुक्त बेळगाव आकाश चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शामराव पाटील चेअरमन राजारामबापू बँक सांगली व स्वागताध्यक्ष म्हणून दक्षिण महाराष्ट्र मंडळ बेळगावचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हसन देसाई. व राष्ट्रीय प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी, कार्याध्यक्ष बाबुराव पाटील, कोषाध्यक्ष गुलाबराव पाटील, मार्गदर्शक लालासाहेब पाटील, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन कोठेवार यांची उपस्थिती अधिवेशनाला राहणार आहे तरी बेळगाव येथील अधिवेशनला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या कथामाला सभासद, साने गुरुजी प्रेमीनी , पदाधिकारी, कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अहवान राष्ट्रीय प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी याने कथामालेकडून केले आहे.

0 Comments