प्रभाग ३ च्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत येणाऱ्या शाहीर वस्ती, घोंगडे वस्ती व जोडभावी पेठ परिसरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रचाराला वेग आला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अनुभवसंपन्न व जनतेच्या प्रश्नांशी जोडलेले नेतृत्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत असून, भाजपच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सांगण्यात आले की, परिसरातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व नागरी समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. “आपल्या भागाच्या प्रगतीसाठी आणि दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून आपल्या हक्काच्या माणसांना निवडून द्या,” असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अ) श्री. राजू बालराज पाटील, ब) सौ. स्वाती दत्तात्रय बडगू, क) सौ. रंजिता सकलेश चाकोते, ड) श्री. संजय बसप्पा कोळी यांनी नागरिकांशी संवाद साधत विकासाभिमुख अजेंडा मांडला.
उमेदवारांनी सांगितले की, प्रभागातील सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान कारभार करण्याचा आपला संकल्प आहे. “कमळाचे बटण दाबा, विकासाला साथ द्या,” या संदेशातून भाजपच्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रचारादरम्यान नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात प्रभाग क्रमांक ३ च्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

0 Comments