Hot Posts

6/recent/ticker-posts

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात बालीका दिन, पर्यावरण संरक्षण विषयावर कायदेविषयक शिबिर यशस्वीरित्या संपन्न.

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात बालीका दिन, पर्यावरण संरक्षण विषयावर कायदेविषयक शिबिर यशस्वीरित्या संपन्न. 



 सांगोला  (कटूसत्य वृत्त):- मा.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, मा. प्रमुख जिल्हा न्यायधीश सााे, तथा मा. अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर मा. श्री. एम.एस.शर्मा साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूर मा. श्री. पी.पी.पेठकर साहेब यांचे सहकार्याने सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ सेवा संघ, सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने शनिवार, दि ०३ जानेवारी २०२६ रोजी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय, सांगोला येथे बालीका दिन व पर्यावरण संरक्षणाविषयी कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरीता सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष ॲड श्री एम.एन.ढाळे, विधीज्ञ संघाच्या महीला प्रतिनीधी ॲड श्रीमती एस. व्ही. बोत्रे, सांगोला विधीज्ञ संघाचे जेष्ठ सदस्य ॲड. विजयसिंह भि. चव्हाण, सांगोला विधीज्ञ संघाचे सचिव ॲड श्री. ए.टी.तोरणे, सांगोला विधीज्ञ संघाच्या महीला सदस्या श्रीमती ॲड. श्रीमती एच डी मेनकुदळे, सांगोला विधीज्ञ संघाच्या महीला सदस्या ॲड. श्रीमती. सी.व्ही.बनकर, सांगोला विधीज्ञ संघाच्या महीला सदस्या ॲड. श्रीमती. एन.एम.जवंजाळ, सांगोला विधीज्ञ संघाच्या महीला सदस्या ॲड. श्रीमती. पी.एच.चव्हाण, आदर्श शिक्षण संंस्थेचे सचिव मा. निलकंठ शिंदे सर, मुख्याध्यापक आर.एम.पवार सर तसेच संस्थेमधील सर्व शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
  या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पुजनाने करणेत आली. या कायदेविषयक शिबीराचा मुख्य उद्देश पर्यावरण संरक्षण हा होता. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आदेशीत केल्याप्रमाणे Implementatin of “Protect Today, Secure Tomorrow“ Environmental Legal Literacy and Community Protection Initiative ही संकल्पना घेवून या विशेष कायदेविषयक शिबीराचे आयोजन करणेत आले होते. या विषयावर सांगोला विधीज्ञ संघाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. विजयसिंह भि. चव्हाण यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. आपले मार्गदर्शनपर भाषणात ॲड. विजयसिंह भि. चव्हाण यांनी अनेक उदाहरणांचा संदर्भ देताना वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाकरीता तयार करणेत आलेले अनेक कायदे, कायदयांची निर्मीत,कायदयाची गरज, अंमलबजावणी व त्याचे आपल्या दैनंदीन जीवनामध्ये होणारे अनेक फायदे सर्व उपस्थीतांना समजावून सांगितले. 
  मुख्याध्यापक  आर.एम.पवार सर यांनी हे शिबीर शाळेमध्ये घेण्याचे महत्व समजावून सांगितले. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा एका कुटूंबाचा घटक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यापर्यंत देण्यात आलेली माहीती ही कुटूंबापर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्यामुळे हे शिबीर शाळेमध्ये घेण्यात आलेचे त्यांनी आवर्जुन सांगितले. 
 आपले अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त करताना दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. आर. कुलकर्णी सााे, यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असलेचे नमूद केले. तसेच पर्यावरण संरक्षणाकरीता समाजातील प्रत्येक घटकाने आपले योगदान देणे खूप महत्वाचे असलेचे सांगितले. याकरीता प्रत्येकाने कमीत कमी एक तरी झाड लावून त्या झाडाचे संगोपन करणे गरजेचे असलेचे सांगितले.  
 हा कार्यक्रम यशस्वी करणेकरीता सांगोला न्यायालयाचे सहा अधिक्षक श्री. ए. एस. बमनळ्ळी, सहा अधिक्षक श्री. डी. डी. मायभाटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपीक श्री. डी.एम.डोईफोडे व कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय , सांगोला येथील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments