पदयात्रा, बैठकां आणि सोशल मीडियावर काँग्रेसचा समन्वित प्रचार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला फक्त पाच दिवस शिल्लक असल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांकडून सोशल मीडियावर तसेच होम टू होम प्रचारावर जोर देण्यात आला आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये उमेदवार सक्रियपणे मतदारांपर्यंत पोहोचत आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील ४७ उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर लढत आहेत, तर एक उमेदवार अपक्ष असून त्याला काँग्रेसकडून पाठबळ मिळत आहे.
काँग्रेसकडून प्रचारासाठी सभां, बैठका, रिक्षा दौरे, कॉर्नर सभा आणि मतदारांच्या घराघर भेटी यावर भर दिला जात आहे. तसेच सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून छोट्या व्हिडिओंमधून प्रचार करून मतदारांपर्यंत संदेश पोहोचवला जात आहे.
महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, यासाठी खासदार प्रणिती शिंदे प्रत्येक प्रभागात सभा व बैठका घेऊन उमेदवारांचे प्रचार चालवत आहेत.
काँग्रेसकडून रील्स, पदयात्रा, बैठका व सोशल मीडियाचा समान समन्वय करून प्रचाराची गती वाढवण्यात येत असल्याचे दिसत आहे.
0 Comments