Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात

 नेताजी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलातील मराठी प्राथमिक शाळा, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ वा प्रजासत्ताक दिन  उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजशेखर घंटे, सहसचिवा वैशाली अभंगे, प्राथमिक पालक-शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष पुजारी, माता पालक संघाच्या सदस्या भाग्यश्री बंदलगी, इंग्लिश मिडीयम माता पालक संघटनेच्या सदस्या रुपाली म्हमाणे, इंग्लिश मिडीयम पालक-शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष रमेश परशी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी  जयश्री घुगरे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताने झाली. त्यानंतर संविधान वाचन, असाक्षर मुक्त गावाची शपथ, कॉपीमुक्त शपथ, संचलन, कवायत, स्फूर्तीगीत, विद्यार्थ्यांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने सादर करण्यात आले. खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विद्यार्थ्यांनी  झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान, भारतभूमीचे आम्ही लेकरे, ए मेरे वतन के लोगो आदी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्वरा चाळक, रिया बारड, स्वरा म्हेत्रे, समर्थ कोडमुर, श्राव्या नडगेरी, आर्यन बनसोडे, प्रांजल बनसोडे, अंजली तावसकर व स्वाती ठोंबरे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद केले.
यावेळी अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, भारत हा विविधतेत एकता जपणारा महान देश असून, संविधानाच्या मूल्यांवर चालत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सांगितले. येणाऱ्या काळात भारत जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी म्हणाले, विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्रिय एकात्मा यातून नेहमी देश करावे. यातून लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व सामाजिक बांधिलकी दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले तर शिवानंद पुजारी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments