Hot Posts

6/recent/ticker-posts

सीतामाता ज शेळके प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात

 सीतामाता ज शेळके प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात



 अक्क्लकोट (कटूसत्य वृत्त) :- तालुक्यातील नागणसूर येथील श्रीमती सीतामाता ज. शेळके प्रशालेत ७७ वा  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम संस्था अध्यक्ष अखिल भारतीय शिवाचार्य संघटनेचे उपाध्यक्ष श्री ष. ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी व  बम्मलिंग देवरु यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,राज्य गीत,ध्वज गीत सादर केले.शरदचंद्र गंगोंडा यांनी संविधान प्रास्ताविक सादर केले.यावेळी विविध देशभक्तीगीतांवर संगीत कवायत घेण्यात आली .विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतले तदनंतर  विजयी विश्व तिरंगा प्यारा , स्वागत गीत, जयस्तुते जयस्तुते श्री महानमंगले  हे  स्फुर्तिदायक गीत सादर केले.कुष्ठरोग निर्मूलन व  साक्षर अभियान संदर्भात शपथ घेण्यात आली.यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेली ज्योती प्याटीला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.गंगोत्री मठपती, श्रवंती लिंबितोटे, अश्विनी धनशेट्टी, अंबिका मायनाळे, ज्योती प्याटी, वैष्णवी  शिवूर, आकांक्षा देशमुख ,साक्षी गगोंडा आदी विद्यार्थ्यांनी भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले,  विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत भारतीय संस्कृती जपणे काळाची गरज आहे. आपल्या देशाचे आचार विचार जगात सर्वश्रेष्ठ असल्याने प्रत्येकांनी पाळावे व देश सेवा करावे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका विणा  पाटील, सहशिक्षक काशिनाथ फुलारी, महबूब नागणसूर, रामेश्वर सोलापुरे, शरदचंद्र गंगोंडा, शिवकुमार गंगोंडा आदीनी परिश्रम घेतले. यावेळी गावचे उपसरपंच शरणप्पा प्रचंडे, तंटामुक्त अध्यक्ष प्रसाद प्रचंडे , नागणसूर केंद्रप्रमुख इराप्पा गजा,श्रीमंत धनशेट्टी, संस्थेचे सचिव जगन्नाथ गंगोंडा, धर्मा प्रचंडे,चंद्रकांत खिलारी, गुरप्पा दरगोंडा, शिवपुत्र धनशेट्टी, गंगप्पा हडपसर,  सिद्धाराम गंगोंडा, गजानन प्रचंडे, श्रीशैल गगोंडा, बसवराज हनमगोंडा, लक्ष्मण  हनमगोंडा ,बसवराज मलगोंडा आदी मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविले. होते. खाऊ वाटपांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments