थोबडे वस्ती आणि साठे पाटील वस्तीमध्ये गणेश वानकर यांच्याकडून नंदनवन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 7, 2026

थोबडे वस्ती आणि साठे पाटील वस्तीमध्ये गणेश वानकर यांच्याकडून नंदनवन

 थोबडे वस्ती आणि साठे पाटील वस्तीमध्ये गणेश वानकर यांच्याकडून नंदनवन  





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राजकारणात नेता कोणत्या पक्षात आहे,याचा जनतेवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. नगरसेवक असताना केलेली कामे जनता आजही विसरलेली नाही. याचा प्रत्यय प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपचे उमेदवार गणेश वानकर यांना प्रचाराच्या दरम्यान येत आहे. 
   प्रभाग क्रमांक ६ चे भाजपचे उमेदवार गणेश वानकर,सोनाली गायकवाड ,मृण्मयी गवळी आणि सुनील खटके यांचा मंगळवारी होम टू होम प्रचाराचा दुसरा दिवस होता. या दरम्यान सकाळच्या सत्रात उमेदवारांनी साठे पाटील वस्ती तसेच थोबडे वस्ती भागातील नागरिकांशी संवाद साधताना गणेश वानकर यांनी नगरसेवक असताना मागील पाच वर्षात या भागात केलेली कामे आणि परिसराचे केलेले नंदनवन यांच्या आठवणी ताज्या झाल्या. घरोघरी उमेदवारांचे स्वागत करताना,दादा आपण दिलेल्या रस्ते,वीज व पाणी या मूलभूत सुविधांमुळे परिसरातील अडचणी कायमस्वरूपी निकाली लागल्याचे नागरिकांनी सांगून दादांच्या विजयात मोठा हातभार लावला. 
पिण्याचे पाणी हा महिलावर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. हाच पाण्याचा विषय गणेश वानकर यांनी कायमस्वरुपी सोडविल्यामुळे महिलावर्गांनी अक्षरशः भाजपचे उमेदवार गणेश वानकर यांच्या आरत्या करून कृतज्ञता व्यक्त केली.घरोघरी उमेदवाराचे दमदार स्वागत करण्यात आले. महापालिकेत भाजपाची सत्ता आणि नगरसेवक शिवसेनेचा असताना विकासाचा धडाका लावला आहे. आणि आता तर सत्ताधारी भाजपसोबत गणेशदादा गेल्यामुळे प्रभागाच्या  विकासाचे चित्रच बदलू जाणार असल्याच्या भावना नागरिकांची व्यक्त करत या भागातून भाजपाला सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याची ग्वाही नागरिकांनी दिली.थोबडे वस्ती,साठे पाटील वस्तीसह संपूर्ण परिसर भाजप उमेदवारांनी पिंजून काढला. 
    यावेळी अरुण जाधव,आशिष डिगोळे,महेश मुदलियार ,नागेश मस्के,सोमाथ मस्के,प्रमोद आवताडे,नवनाथ मस्के,समर्थ डोंगरे,रितेश मस्के,चेतन घुले,योगेश मस्के,महादेव काळे,सागर डोंगरे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 महिलांच्या समस्यांना प्राधान्य
 प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवेसाठी सामोरे जात आहोत. प्रभागातील महिलांच्या समस्या सोडविण्याला आपले प्रथम प्राधान्य असणार आहे. विशेषतः शौचालयाचा मोठा प्रश्न असून सोलापूर महानगरपालिकेत याच महिलांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर आपण आवाज उठविणार असल्याचे भाजपचे उमेदवार मृण्मयी गवळी यांनी महिलांशी संवाद साधताना सांगितले. नगरसेवक असताना गणेश दादा वानकर यांनी केलेले विकास कामे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना सर्वाधिक मताने विजय करण्यात मोठा हातभार लावणार असल्याचेही मृण्मयी गवळी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages