श्री भगवती गौरीमाता प्रशालेच्या विज्ञान साहित्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील श्री भगवती गौरीमाता प्रशालेतील बसवराज रविकांत तोळणुरे या विद्यार्थ्यांची सौर कृषी पंप या विज्ञान साहित्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
स्वेरी इंजिनिअरींग कॉलेज पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात प्रशालेतील बसवराज तोळणुरे या विद्यार्थ्यांनी सौर कृषी पंप हे विज्ञान साहित्य मांडले होते. परिक्षक तथा विज्ञान व टेक्निकल तज्ञांनी त्याच्या सौर कृषी पंप साहित्याची निरिक्षण करुन जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक देऊन राज्य विज्ञान प्रदर्शनासाठी निवड केली आहे. या विद्यार्थ्यांला प्रयोगशाळा परिचर महेश हांडगे, सहशिक्षक नागेशप्पा लंगोटे , सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक सुरेश घागरे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्री बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती श्री बालपस्वी चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, सचिव शांतय्या स्वामी,मुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक सचिन देगांवकर, विज्ञान विभाग प्रमुख अरुण हत्ताळी, विज्ञान विषय शिक्षिका वर्षा बिराजदार,ज्योती कलबुर्गी व सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले. धोत्री पंचक्रोशीत शाळेचे कौतुक होत आहे.
*चौकट*
*सौर कृषी पंप साहित्याचा उपयोग*
हे सौर कृषी पंप शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. पेट्रोल अथवा डिझेल न वापरता , निसर्ग निर्मित सौर उर्जेवर चालणारे प्रदुषण विरहीत किडनाशक, किटकनाशक, तणनाशक फवारणीसाठी वापर केला जातो.यासाठी शेतकरी आपल्या डोक्यावर असलेल्या हेल्मेट अथवा टोपीवर सौर प्लेट बसवून हात पंप चालवून फवारणी करु शकतो. हि नवनिर्मिती विज्ञान साहित्य पेटंटसाठी कंपनी पुढे येतील व शेतकऱ्यांना नक्कीच उपयोगी पडेल अशी अपेक्षा सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक श्री सुरेश घागरे सर यांनी व्यक्त केले.

0 Comments