मनसे नेते धोत्रेंच्या पाठीवर राज ठाकरेंची कौतुकाची थाप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 2, 2026

मनसे नेते धोत्रेंच्या पाठीवर राज ठाकरेंची कौतुकाची थाप

 मनसे नेते धोत्रेंच्या पाठीवर राज ठाकरेंची कौतुकाची थाप




पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे भाजपा प्रणित परिचारक गटाची गेली चार दशकाची सत्ता उलथवून लावली. ऐतिहासिक विजय मिळवत नगराध्यक्षसह प्रभाग क्रमांक १७ मधून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे यांचा नगरसेविका म्हणून विक्रमी मताने विजय झाला. यानंतर मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेट घेतली. राज ठाकरे यांची दिलीप धोत्रे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन अभिनंदन केले.

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत  सत्ताधारी भाजपा प्रणित परिचारक आघाडी विरुद्ध सर्वपक्षीय तीर्थक्षेत्र विकास आघाडी मध्ये प्रमुख लढत झाली होती. यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह मनसेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला येथील नागरिकांनी विक्रमी मतांनी निवडून दिले. या निवडणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याने पंढरपूर नगरपालिकेत गेली ४० वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. पंढरपुरात मनसेची ताकद अधिकच वाढली आहे. या यशानंतर नुकतीच मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी मुंबई येथे राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरे पंढरपुरात कार्यकर्त्यांना भेटणार
पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत दिलीप धोत्रे यांच्याशी राज ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली. विजयाची घोडदौड आगामी काळातही सुरुच ठेवावी. वेळप्रसंगी पंढरपूर येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितल्याचे धोत्रे यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages