चोपडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (कटूसत्य वृत्त):- चोपडी जिल्हा परिषद गटातून सर्वसाधारण जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी चोपडी गटाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प जाहीर केला आहे. “विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. चोपडी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास हेच माझे एकमेव ध्येय आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी नाझरे येथील दत्तानंद स्वामी समाधी दत्त मंदिर,श्री बाळब्रह्मचारी योगी समर्थ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज समाधी, श्री अंबिका मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री महादेव मंदिर, दर्गा या ठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन मतदारांशी संवाद साधला. यावेळी नाझरे गावातून पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मतदार, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत मतदारांशी संवाद साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडी जिल्हा परिषद गटात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यांसह सर्व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष भर देण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लावून गावागावात पायाभूत सुविधांचे जाळे मजबूत करण्याचा निर्धार महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला. शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
महायुतीच्या माध्यमातून विकासाभिमुख आणि स्थिर नेतृत्व देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चोपडी जिल्हा परिषद गटात शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार असून, त्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली जाईल. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय, दर्जेदार रस्ते, अखंड वीजपुरवठा, आरोग्य सुविधा बळकट करणे, तसेच शैक्षणिक सोयीसुविधा वाढवणे या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
शासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे, पारदर्शक पद्धतीने आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे. शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी लोकसहभागातून विकासाचे मॉडेल राबवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “चोपडी जिल्हा परिषद गटाचा विकास करून लोकांच्या विश्वासावर खरे उतरून पारदर्शक, गतिमान आणि विकासाभिमुख कारभार देण्याचा प्रयत्न राहील,” असे ठाम मत व्यक्त करत महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी मतदारांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले.
यावेळी चोपडी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत, चोपडी पंचायत समितीचे उमेदवार अजय सरगर, राजुरी पंचायत समितीचे उमेदवार सदाशिव दबडे यांच्यासह सुरेश (काका) चौगुले, संजय शेळके, मंगेश रायचुरे, हणमंत गोसावी, विनायक सरगर, भालचंद्र भंडारे, दीपक बनसोडे, अक्षय सरगर, भारत चव्हाण, जालिंदर सरगर, भारत शेळके, दादा ननवरे, अमोल तेली, ज्ञानेश्वर सरगर, भाऊ पाटील, आनंदा बनसोडे, माऊली बनसोडे, संतोष घोडके, नागेश भंडारे, अण्णा पाटील, उपसरपंच बंडू केदार, संभाजी चव्हाण, बाळासाहेब केदार, मुकुंद पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
.png)
0 Comments