Hot Posts

6/recent/ticker-posts

व्हॉईस ऑफ मीडिया, बार्शीच्या वतीने पत्रकार दिन साजरा

 व्हॉईस ऑफ मीडिया, बार्शीच्या वतीने पत्रकार दिन साजरा






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त (पत्रकार दिन) व्हॉईस ऑफ मीडिया, शाखा बार्शी यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती विजय गरड हे होते.प्रमुख उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर,
व्हॉईस ऑफ मीडिया – इंटरनॅशनल फोरमचे प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलीळ,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, डॉ.श्रीधर अंधारे उपस्थित होते.

यावेळी पत्रकार दिनानिमित्त खालील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला —
सचिन अपसिंगकर (दैनिक सुराज्य),
उमेश पवार (दैनिक सकाळ),
विजय निलाखे (दैनिक दिव्य मराठी),
शहाजी फुरडे (दैनिक लोकमत),
धैर्यशील पाटील (संपादक – सत्यचित्र),
सिकंदर आतार (संपादक – भगवंत एक्सप्रेस).

या कार्यक्रमाचे आयोजन प्रविण पावले (राज्य कोषाध्यक्ष, VOM – डिजिटल विंग),ओंकार हिंगमिरे (सोलापूर जिल्हा सचिव, VOM),निलेश झिंगाडे (बार्शी शहराध्यक्ष, VOM),मयूर थोरात (बार्शी शहर उपाध्यक्ष),समाधान चव्हाण (बार्शी शहर सचिव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर म्हणाले की, पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांचे सत्य निर्भीडपणे समाजासमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करतात. प्रशासनातील त्रुटी दाखवून त्या दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडण्याचे काम पत्रकार करतात.

रणवीर राऊत यांनी पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधत, सत्याच्या मुळाशी जाऊन बातमी करताना सामाजिक जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात विजय गरड म्हणाले की, राजकारणात योग्य निर्णय व चांगल्या कामाची पोचपावती मिळण्यासाठी प्रामाणिक व अचूक पत्रकारितेची नितांत गरज आहे.

तर अजित कुंकूलीळ यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्य सुरू असून, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य विमा, शिक्षणविषयक मदत तसेच विविध प्रश्न शासन दरबारी मांडून निर्णय घेण्यास भाग पाडण्यात संघटनेला यश आले आहे, असे सांगितले.

कार्यक्रमास व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे सदस्य
प्रदीप माळी, उमेश काळे, शाम थोरात, विजय शिंगाडे, जमीर कुरेशी, विक्रांत पवार, पवन श्रीश्रीमाळ, अपर्णा दळवी, ऋषीकेश अंधारे, आतिश कसबे, मल्लिकार्जुन धारूरकर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments