छत्रपती ब्रिगेडची नूतन पदाधिकारी कार्यकारणी जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 2, 2025

छत्रपती ब्रिगेडची नूतन पदाधिकारी कार्यकारणी जाहीर

 छत्रपती ब्रिगेडची नूतन पदाधिकारी कार्यकारणी जाहीर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती ब्रिगेड या सामाजिक संघटनेची नूतन कार्यकारणीची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम कदम यांच्या अध्यक्षतेखाली जुळे सोलापूर भागातील म्हेत्रे टॉवर येथील सभागृहात पार पडली यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक शाम कदम यांनी छत्रपती ब्रिगेड ही सामाजिक संघटना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने व प्रेरणेने निर्माण झाली असून अठरा पगड जाती धर्माच्या युवकांना एकत्रित करून सोलापूरच्या विविध प्रश्नावर व विकासावर भर देऊन सोलापुरातील प्रश्न मार्गी लावण्याचे कार्य करेल तसेच शिव शाहू फुले आंबेडकर बसवण्णा यांच्या विचारावर संघटनेची वाटचाल राहील असे मत व्यक्त केले. 
या कार्यक्रमाचे वेळी  संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड पुढील प्रमाणे करण्यात आली - 
छत्रपती ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद शेळके शहराध्यक्षपदी सिताराम बाबर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी मोनाली धुमाळ शहराध्यक्षपदी माधुरी चव्हाण जिल्हा उपाध्यक्षपदी आरती नारायणकर शहर उपाध्यक्षपदी शुभांगी लचके जिल्हा संपर्कप्रमुख इस्माईल मकानदार जिल्हा कार्याध्यक्ष गजानन शिंदे जिल्हा उपाध्यक्ष रमेश चव्हाण, मल्लिकार्जुन भंडारे जिल्हा संघटक गौरीशंकर वरपे, अमोल सलगर जिल्हा सचिव बबन डिंगने, ज्ञानेश्वर पवार जिल्हा कार्याध्यक्ष नागेश पवार शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे शहर कार्याध्यक्ष सिद्धाराम कोरे  शहर सचिव तेजस गायकवाड शहर उपाध्यक्ष सुलेमान पिरजादे शहर सचिव बसवराज आळंगे शहर प्रसिद्धी प्रमुख मल्लिकार्जुन शेवगार शहर संघटक संकेत कुलकर्णी.
यावेळी छत्रपती ब्रिगेडचे सनी पाटु स्वप्निल शिंदे शाहिद सय्यद महेश भंडारे विश्वनाथ आमाने अमोल भोसले ओंकार कदम सिद्धाराम आवटे अमजद मुल्ला विकास बचुटे आधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages