Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचे प्रश्ना बाबत बुधवारी मंत्रालयात बैठक

 पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचे प्रश्ना बाबत बुधवारी मंत्रालयात बैठक


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी  यांचे प्रलंबित प्रश्नावर चर्चा करणे साठी राज्य कृती समितीला चर्चेसाठी बुधवार दिनांक 3  डिसेंबर रोजी मंत्रालयात बैठक बोलाविणेत आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमांकात जाधव व कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली आहे. 
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत कर्मचारी यांचे वेतन रखडले मुळे व विविध मागण्यांसाठी गुरुवारी राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन करणेत आले. दिनांक १ डिसेंबर पासून धरणे आंदोलन सुरू करणेचा  इशारा देणेत आला होता. दरम्यान आज पाणी पुरवठा व स्वच्छचा विभागाचे कक्ष अधिकारी  वि. आ. जायकर यांनी राज्य
कृती समितीला पत्र काढून कर्मचारी यांचे प्रश्ना बाबत निमंत्रीत केले आहे. स्वच्छ भारच मिशन चे प्रकल्प संचालक यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. 
जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत एकत्रित कर्मचारी काम करीत आहेत.
जिल्हा व तालुका स्तरावर काम करणारे  या कर्मचारी यांचा आकृतीबंध करणेत आलेला नाही. शासनात कायम करणेची मागणी बरोबर या कर्मचारी मासिक वेतन कधीच वेळेवर दिले जात नाही.  
विभागासाठी प्रशासकीय खर्चासाठी गेल्या वर्षभरापासून निधी उपलब्ध नाही. यामुळे कामावर परिणाम झालेला आहे.
जलजीवन मिशन च्या जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचारी यांचे ऐन दिवाळीत तीन महिने वेतन रखडले होते. निधी असूनही स्वच्छ भारत मिशन च्या कर्मचारी यांचे वेतन रखडलेने कर्मचारी यांचे मनात असंतोषाची भावना निर्माण झाली होती. या वरून  राज्यभर आंदोलन करणेत आले आहे. प्रकल्पा साठी निधी आहे मात्र कर्मचारी यांचे वेतना साठी निधी उपलब्ध नाही ही बाब कर्मचारी यांचे मुलभूत हक्कावर गदा आणणारी होती. या
सर्व बाबीची दखल घेऊन मंत्रालयात या बैठकीचे आयोजन करणेत आले असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड व कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments