Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डुवाडीत ७० टक्के मतदान

                                                     कुर्डुवाडीत ७० टक्के मतदान 



अनेक मतदान केंद्रावर नागरीकांची दमछाक
कुर्डुवाडी(कटूसत्य वृत्त):-   
येथील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होऊन नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी ७० टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावरील कोणत्या खोलीत आपले मतदान आहे, या संभ्रमावस्थेत नागरीक असल्याचे दिसून आले. पाच वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४० होती.
आठ वर्षांनंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ओबीसी महिला या जागेवर सत्ताधारी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यातर्फे जयश्री भिसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे सुरेखा गोरे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने समिरुनिसा मुलाणी, भाजपच्या वतीने माधवी गोरे तर काँग्रेसच्या वतीने मनीषा गवळी व अपक्ष म्हणून सीमा सदानंद मोरे या नशीब आजमावत आहेत तर २० नगरसेवक पदासाठी १०३ उमेदवारांचा निकाल मतपेटीत बंद झाला. मतदानाची टक्केवारी सुरुवातीला संथ गतीने झाली दुपारी दीड वाजेपर्यंत २५ टक्के मतदान झाले होते दुपार नंतर मतदानाला वेग आला. अनेक उमेदवार मतदारांना वाहनामधून मतदान केंद्रापर्यंत आणत होते तर वयोवृद्ध असलेल्या नागरिकांनाही उमेदवार मतदान केंद्रात धरून घेऊन जात होते. मतदान केंद्रात या नागरिकांसाठी चार चाकी खुर्चीची व्यवस्था केली होती.
प्रभाग क्रमांक एक, तीन, चार, सात, आठ व दहामध्ये मोठी चुरस पहावयास मिळत होती. रात्रीतच मतदाराला अनेकांनी लक्ष्मी दर्शन घडविल्याची चर्चा ऐकवास येत होती. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे कार्यकर्ते व इतरही उमेदवार आपल्या समर्थक मतदारांना मतदार केंद्रापर्यंत घेऊन येत होते.
Reactions

Post a Comment

0 Comments