दुधनीत ७०.९७ टक्के चुरशीने मतदान
दुधनी (कटूसत्य वृत्त):- दुधनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठी ने चुरस दिसून आली. एकूण ७०.९७ इतके टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली
होती. सकाळी दोन तासांमध्ये १३.५ टक्के मतदान झाले होते. पाच नगराध्यक्ष व ५३ नगर सेवकांचे भवितव्य बंद झाले आहे.
दुधनी नगर परिषदेची निवडणूक म्हेत्रे परिवाराच्या अस्तित्वाची व आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रतिष्ठेची ठरली आहे. काँग्रेसमुळे कोणाला फटका बसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सकाळपासूनच माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुधनीत तळ ठोकला होता. या निवडणुकीमध्ये परगाहून मतदान करण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. दुपारी आ. सचिन कल्याणशेट्टी यानी भेट देवून पाहणी केली. दहा प्रभागातून, १६ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. एकूण मतदान १०९०५, पुरुष - ५५५४, महिला- ५३५०, इतर एक आहे. रिंगणात ५३ सदस्य व पाच नगराध्यक्ष नशिब आजमावत आहे.
0 Comments