करमाळ्यात ७० टक्के मतदान; उशिरापर्यंत मतदान
करमाळा(कटूसत्य वृत्त):- करमाळा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये आज सकाळी बटन ने दाबल्यानंतर कंट्रोल युनिटची मशिनची द लाईट लागत नसल्याच्या तक्रारी झाल्याने मशीन बंद ठेवण्यात आली. त्यामूळे तासभर मतदान ठप्प झाले होते. यानंतरही सायंकाळीही पाचच्या सुमारास मतदान प्रतिनिधींनी मतदारांचे मत योग्य ठिकाणी जात नसल्याची तक्रार केल्याने मोठा गोंधळ उडाला.
यावेळीही १५ मिनिट मतदान बंद होते. त्यानंतर मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून यामध्ये तथ्य नसल्याचे सांगत मतदान सुरळीत केले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस., वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजीत माने, पोलिस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे यांचा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. मतदान अधिकारी व मतदारांमध्ये चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले. वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांना मज्जाव करण्यात आला. यावेळीही गेटला कुलूप लावण्यात आले. याप्रसंगी आतमध्ये प्रवेश करणाऱ्या मतदार व पोलिसांमध्ये हुज्जत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे थोडेफार तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्र क्रमांक तीनमध्ये उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
0 Comments