मैंदर्गीत ७२.८९ टक्के मतदान; जोरदार लढत'
मैंदर्गी (कटूसत्य वृत्त):- मैंदर्गी नगर परिषद निवडणुकीत ७२.८९ इतक टक्के मतदान झाले. भाजपा पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे चित्र दिसून आले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान करण्याकरता
नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक गट व भाजपामध्ये या ठिकाणी प्रथमच इतक्या मोठ्या
प्रमाणात लढत दिसून आली.
१९ सदस्य व एक नगराध्यक्षपदा करिता निवडणूक पार पडली. दहा प्रभागातून २० बूथवर मतदान घेण्यात आले. १५ सदस्यांमध्ये दुरंगी लढत झाली. नगराध्यक्षपदाची देखील दुरंगीच लढत होती. भारतीय जनता पार्टी प्रथमच मैंदर्गी निवडणुकीत पार्टी प्रथमच मैंदर्गी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार उभे मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार उभे करून पूर्ण ताकदीनिशी उतरले होते.
यामुळे स्थानिक गटाला पूर्ण जोर लावावा लागला. प्रभाग ६ अ मध्ये एक उमेदवाराची निवडणूक सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २० डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी सांगितले.
चौकट
प्रभाग १० मध्ये कमालीची चुरस
प्रभाग ९ व १० मध्ये मोठी चुरस दिसून आली. प्रभाग १० मध्ये भाजपा शहराध्यक्ष सुरेश नागूर व गटप्रमुख महेश शावरी नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून समजले जाणाऱ्या दोघात मोठ्या प्रमाणात चुरस दिसून आली . गटप्रमुख केसुर व जकापूरे यांच्यामध्ये देखील मोठी चुरस होती. गटाचे अस्तित्व पुढील काळामध्ये पहावयास मिळणार की नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.
:
0 Comments