काही मतदान केंद्रांत मशिनमध्ये बिघाड, किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):-
अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणकीसाठी नगराध्यक्ष वनगरसेवक पदाकरिता शहरात २० प्रभागातील मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीने अंदाजे ६० टक्के मतदान झाले.
अक्कलकोट शहरातील ४४ मतदान केंद्रांवर ३८ हजार ४४२ मतदार असून २५ नगरसेवक पदाकरिता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
सकाळच्या दरम्यान साडेअकरा वाजेपर्यंत २१ टक्के मतदान झाले तर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी झाली. शहरातील काही मतदान केंद्रामध्ये
मशिनमध्ये बिघाड झाल्याने काही काळ थांबून परत पुरवत मतदानास प्रारंभ झाले. भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मीलन कल्याणशेट्टी, काँग्रेसचे उमेदवार अशपाक बळोरगी,शिवसेना शिंदे गटाचे रईस टीनवाला यांनी दिवसभर विविध मतदान केंद्रांवर भेटी दिल्या कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. केवळ किरकोळ ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाली. आहे. मैंदर्गीत आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांनी भाजप बूथला भेट दिल्यानंतर स्वतः तेथे बसून मतदारांना स्लिपचे वाटप केले. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावर यांनी अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी येथे भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली.
अक्कलकोट नगर परिषद निवडणूक करता गेल्या पंधरा दिवसापासून राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्यातच खरी लढत पाहायला मिळाली. या काळात
भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह विविध नेत्यांनी उपस्थिती लावली तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह विविध मान्यवरांनी शक्ती पणाला लावत जोरदार सभा घेतल्या तर काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, माजी नगराध्यक्ष सुवर्ण मलगोंडा ह्या खिंड लढत अक्कलकोट येथे जाहीर सभा घेतल्या. मतदान संपल्याने तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार होते मात्र नागपूर खंडपीठाने २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केल्याने उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे.
0 Comments