Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपरिषदेसाठी चुरशीने ७० टक्के मतदान

 पंढरपूर नगरपरिषदेसाठी चुरशीने ७० टक्के मतदान


दुपारी ३.३० वा. पर्यंत ४३ टक्के, दुपारनंतर मतदानासाठी मतदान केंद्रांवर लागल्या रांगा


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-  

पंढरपूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी मतदान करण्यासाठी मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दोन ठिकाणच्या मतदान यंत्रात बिघाड वगळता मतदान शांततेत पार पडले. रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती. पंढरपूर नगरपरिषदेसाठी सरासरी ७० टक्के इतके मतदान चुरशीने झाले आहे.

पंढरपूर नगरपरिषदेसाठी सकाळी ७.३० ते ९.३० मतदान केंद्रांवर पुरुष २९३९, स्त्री २०२६ इतर ० असे एकूण ४९६५ मतदान झाले आहे. एकूण मतदानाची टक्केवारी ५.२५ होती. तर सकाळी ७.३० ते ११.३० मतदान केंद्रावर पुरुष ७८६६, स्त्री ६३६९ इतर २ असे एकूण १४२३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण टक्केवारी १५.०६ इतकी आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० मतदान केंद्रांवर पुरुष १३८८२, स्त्री १२३५३, इतर ४ असे एकूण २६२३९ मतदारांनी मतदान केले असून त्याची टक्केवारी २७.७५ इतकी आहे.

मतदान केंद्रावर पुरुष २१०८९, स्त्री २०२७२, इतर ६ असे एकूण ४१३६५ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ४३.७५ आहे. मतदान केंद्रांवर भाजपचे नेते प्रणव परिचारक, लक्ष्मण शिरसट यांनी सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके, डॉ. प्रणिता भालके यांनी भेट देऊन पाहणी केली. भालके यांच्या तक्रारीनुसार उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर गडबड झाल्याचे म्हटले आहे. एखादा दुसरा अपवाद  वगळता यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले जात

आहे. त्यामुळे शांततापूर्वक मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली.

दिवसभर मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा उभ्या करून मोठ्या उत्साहाने मतदान केले. वयोवृद्धांपासून ते तरुणांनी लोकशाही उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसट, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉ. प्रणिता भालके व कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला

जास्त थंडीमुळे सकाळी गर्दी कमी

थंडी असल्याने सकाळच्या सत्रात मतदानासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मतदारांनी दिला नाही. त्यानंतर मात्र दिवसभर सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या जवळ सर्वच पक्षाच्या व अपक्षाच्या कार्यकत्यांनी मतदारांना चिट्ट्या देत होते. कार्यकर्ते मतदारआणण्यासाठी लगबग करत होते. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते.



Reactions

Post a Comment

0 Comments