Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला नगरपरिषदेसाठी शांततेत ७७ टक्के मतदान

 सांगोला नगरपरिषदेसाठी शांततेत ७७ टक्के मतदान


सांगोला (कटूसत्य वृत्त):-   

सांगोला नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूकमध्ये नगराध्यक्ष व २१ नगरसेवकासाठी सकाळच्या

सत्रात मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तर रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती. ३३६१८ पैकी मतदान झाले.

२६०९५ सरासरी ७७. ४८ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत व सुरळीत पार पडले.

सांगोला नगरपालिकेसाठी अटीतटीने झालेल्या निवडणुकीमध्ये सकाळी ७.३० ते सकाळी ११ पर्यंत ३

हजार ०९६ महिला तर २ हजार ७८९ पुरुष असे एकूण ५ हजार ८८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकंदरीत १६. ४६ टक्के मतदान झाले होते. सकाळी ७.३० ते दु. ०१. ३० पर्यंत ५ हजार ३५९ पुरुष व ५ हजार २९४ महिला असे एकूण १० हजार ६५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

३१. ६१ टक्के मतदान झाले. तर सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० पर्यंत ७ हजार ९७० महिला व ८ हजार ४९९ पुरुष असे एकूण १६ हजार ४६९ मतदारांनी मतदान केले. यावेळी ४७.८७ टक्के इतके मतदान झाले.

प्रभाग क्रमांक ९ याठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार व शहाजीबापू पाटील यांनी भेट देऊन विचारणा केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असे

सांगितले.

त्यामुळे शांततापूर्वक मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू राहिली. दिवसभर मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा उभ्या करून मोठे उत्साहाने मतदान केले. वयोवृद्धांपासून ते तरुणांनी लोकशाही उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. यासह आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्राची पाहणी केली व मतदान केंद्रावर मतदान केले.

यशोदा नामदेव मगर यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी आपल्या कुटुंबासमवेत मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी सांगोलानगरीच्या दुसऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्षा शकुंतला केदार, सांगोला नगरीच्या

उपनगराध्यक्षा स्वातीताई मगर, अंजना जाधव, विद्या पवार यांच्यासह मतदानाचा पवित्र हक्क बजाविला.

दिवसभर सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी मतदारांनी गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या जवळच सर्वच पक्षाच्या व अपक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना चिठ्ठ्या देत लगबग करत होते.




उमेदवारही व त्यांच्या पक्षाचे नेते मतदार केंद्रांना भेटी देत होते. अनेक ठिकाणी मतदारांना आणण्यासाठी वाहनेही लावण्यात आली होती. मतदान सर्वत्र शांततेत व सुरळीत पार पडले. सर्व उमेदवारांचे नशीब मशीनमध्ये पॅक झाले आहे.

येथील मशीन बदलण्यात आल्या

सकाळच्या सत्रातच प्रभाग क्रमांक २, प्रभाग क्रमांक ५ आणि प्रभाग क्रमांक

मध्ये बटन दाबण्यासाठी अडचणी येऊ लागल्याने ईव्हीएम मशीन

बदलण्यात आल्या. त्याठिकाणी बॅलेट युनिट मशीन देण्यात आले. दरम्यान,

पूर्ववत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments