माजी विद्यार्थिनीचा गौरव म्हणजे विद्यार्थ्यांना प्रेरणा- बाहुबली चंकेश्वरा
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- प्रशालेतील विद्यार्थी केवळ गुणवंतच नाही तर ते देशसेवेतही अग्रेसर असल्याचा आम्हाला अभिमान आहे.जो विद्यार्थी सातत्याने कष्ट करतो तो कोणत्यातरी परीक्षेत हमखास यश मिळवतो डॉ. बा.ज.दाते प्रशालेतील माजी विद्यार्थिनीनी यूपीएससी एमपीएससीचा अभ्यास करून अधिकारी झाल्या त्यांचा गौरव म्हणजे प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा असल्याचे मत नातेपुते एज्युकेशन सोसायटी डॉ.बा.ज. दाते प्रशालेचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा यांनी व्यक्त केले.
ते प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यानी शितल वाघमोडे यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात अधीक्षक तर दिपाली खरात यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्यावतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभा प्रसंगी बोलत होते. बाहुबली चंकेश्वरा पुढे बोलत असताना म्हणाले की,
विद्यार्थ्याकडे वचनबद्धता कठोर परिश्रम आणि समर्पण असणे आवश्यक आहे मोठी स्वप्ने बघून विद्यार्थ्यांनी परिश्रम केले तर यशाचे शिखर गाठणे शक्य होते. ७० टक्के वाला विद्यार्थी सुधा यूपीएससी एमपीएससी चा अभ्यास करून उच्च पदावर अधिकारी होत असल्याचे चंकेश्वरा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रशालेच्या वतीने चेअरमन बाहुबली चंकेश्वरा, व्हा. चेअरमन संतोष काळे यांनी प्रशालीच्या माजी विद्यार्थी शितल वाघमोडे व दिपाली खरात यांच्या निवडीबद्दल शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक प्रवीण बडवे, मुख्याध्यापक विनायक देशपांडे, नवनाथ बांगर, नीता काळे, संजय नाळे तसेच प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments