Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शीत मतदानाची टक्केवारी ६०

 बार्शीत मतदानाची टक्केवारी ६०



बार्शी (कटूसत्य वृत्त):-   बार्शी नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मंगळवारी शहरातील विविध मतदान केंद्रावर मोठ्या चुरशीने ६० टक्के मतदान झाले. महिलांची गर्दी मोठ्या
प्रमाणा दिसून आली.
महायुतीकडून तेजस्विनी कथले, महा विकास आघाडी कडून निर्मला बारबोले या प्रमुख उमेदवारांसह काँग्रेस पक्षाच्या वतीने जाकीराबी शेख, प्रहार जनशक्तीकडून संजिवनी बारंगुळे, एमआयएम पक्षाच्या खाजाबी पठाण तर अपक्ष उमेदवार म्हणून सुप्रिया गुंड ह्या उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावताना दिसून येत आहेत. त्याच्यासह ४१ नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांनी मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क बजावला.
सकाळी ७.३० वाजता मतदानाच्या प्रक्रियेला सुरवात झाली. पहिल्या दोन तासात अवघे ७.३४ टक्के मतदान झाले होते.पहिल्या टप्प्यात पुरुष मतदारांची संख्या जास्त दिसून येत होती.त्यांनंतर हळूहळू गर्दी वाढत गेल्याने मताची टक्केवारी वाढली. ती साडेअकरा वाजेपर्यंत १९.५८ टक्क्यांवर गेली होती. दीड वाजेपर्यंत ३६२०४ मतदान केल्याने ३३.२१ टक्के मतदान झाले. त्यानंतर मताचा जोर 
वाढतच गेला. ५१३२२ मतदारांनी हक्क बजावल्याने साडेतीन वाजेपर्यंत ४७.०८ टक्के मतदान झाले. त्यानंतर मताच्या टक्केवारीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. साधना कन्या प्रशाला येथील ईव्हीएम बिघाडामुळे दीड तास मतदान खोळंबले होते. दरम्यान त्या ठिकाणी नवीन मशीन बसवण्यात आल्यावर मतदाना प्रक्रिया सुरू करण्यात आली. एकाच कुटुंबातील मतदारांची दोन वेगवेगळ्या प्रभागात नांवे असल्याचा प्रकार घडल्याची चर्चा होती. निवडणुकी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असतानाही बार्शीत बाजारपेठ खुली असल्याचे दिसून आले. तसेच दुकानांमध्ये गर्दी दिसून आली.
निवडणुकीत कुंकूलोळ हायस्कूल येथील मतदान केंद्रावर आधार कार्डवर फोटो चिटकवून मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४ महिलांची केंद्राध्यक्षकडे तक्रार केली आहे.
-नागेश अक्कलकोटे, महाविकास आघाडी उमेदवार
कुंकूलोळ हायस्कूल येथील मतदान केंद्रावर असा बोगस मतदानाचा कोणताच प्रकार घडला नसून हे सर्व खोट नाट पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 
महावीर कदम, भाजप शहराध्यक्ष बार्शी

Reactions

Post a Comment

0 Comments