Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळमध्ये १८ जागांसाठी ७२ टक्के मतदान

 मोहोळमध्ये १८ जागांसाठी ७२ टक्के मतदान



पोखरापूर : (कटूसत्य वृत्त):-  मोहोळ नगरपरिषदेच्या जनतेतून नगराध्यक्ष व १० प्रभागातील १८

जागेसाठी मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी अत्यंत चुरशीने शांततेत मतदान झाले. शहरातील २४ हजार ४१३ पैकी १७ हजार ५०० इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

सकाळी साडेसात वाजल्यापासून १० प्रभागातील २७ बुथवर प्रत्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. २० सदस्यांपैकी दोन प्रभागात निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याने १८ जागांसाठी व जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी मतदान झाले. १२ हजार ३३९ पुरुष तर १२ हजार १७ महिला असे एकूण २४ हजार ४१३ मतदान होते. सकाळी ११.३० पर्यंत ५९९३ म्हणजे २४.४३ टक्के मतदान झाले

होते. त्यानंतर दीड वाजेपर्यंत ४१.३८ टक्के तर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५७.३९ टक्के मतदान झाले होते.

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत यामध्ये वाढ झाली. पक्षाचे कार्यकर्ते नातेवाईक मतदारांना मतदान  केंद्रापर्यंत आणून सोडत होते. सकाळी मतदान चालू झाल्यापासूनच दत्तनगरजि. प. शाळा, नागनाश विद्यालय, प. शाळा, नेताजी प्रशाला या केंद्रावर कन्या प्रशाला, आठवडा बाजार जि. गर्दी झाली होती. अनेक उमेदवार तसेच कार्यकर्ते आपापल्या भागातील मतदारांशी फोनवर संपर्क करून मतदानाला येण्याबाबत विनंती करत होते. योवृद्ध नागरिक, महिलांना पोहोचवण्याचे काम करत होते. माजी कार्यकर्ते मतदान बूथ पर्यंत नेऊन गायकवाड, उमेश पाटील, संजय झ आमदार रमेश कदम, ज्येष्ठ नेते दीपक बारसकर, सुशील क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, पद्माकर देशमुख, रमेश हो क्षीरसागर आदींसह प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रत्येक बुथवर जाऊन उमेदवार व कार्यकर्त्यांची भेट घेतली,


दोन ठिकाणी मशिन बंद 

प्रभाग क्र. ४ मधील बुथ नं. २ व प्रभाग क्र. ६ मधील बुथ नं. १ वरील एक अशा दोन ठिकाणी मशिन बंद पडल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्या ठिकाणी बॅलेट युनिट बदलण्यात आले. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

लग्नाची घाई तर दुसरीकडे मतदानाची ओढ

२ डिसेंबर ही लग्नाची तारीख असल्यामुळे शहरासह, पंढरपूर, सोलापूर, तसेच २०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरही मोहोळ शहरातील नागरिकांचे पाहुणे मित्रमंडळी पैकी काहींचे लग्न सोहळे होते. मतदान तर करायचे आहे आणि लग्नही गाठायचे आहे अशी ओढाताण अनेक मतदारांवर आली होती.

Reactions

Post a Comment

0 Comments