अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे ५ तर नगरसेवक पदाचे ९१ उमेदवार असे एकून ९६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ६९.२५ टक्के मतदान झाले. प्रभाग क्र. ५ व ७ चा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
सकाळी थंडीमुळे मतदानाचा वेग कमी होता. जस जसा पारा चढु लागला तस तसे मतदार राजा मतदानाला येऊ लागल्याने दर २ तासांनी टक्केवारीत वाढ होत गेली. राज्य निवडणूक आयोगाच्या नवीन आदेशान्वये ३ डिसेंबर ऐवजी रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होवुन निकाल जाहीर होणार असल्याने आता २० दिवस सर्व उमेदवारांची चिंता व धाकधुक वाढवणारे ठरणार आहेत.
अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत १३ प्रभागांच्या हद्दीतील ३९ मतदान केंद्रावर आज सकाळी ७.३० वा. मतदानास प्रारंभ झाला. सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वा. पर्यत १८ हजार २२८ मतदारांनी मतदान केले. यात ९ हजार १०३ पुरुष व ९ हजार ११९ महिला तर इतर ६ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ५३.४२ इतकी होती आहे. दुपारी ३.३० ते सायं. ५.३० पर्यंत सुमारे ६९.२५ टक्के मतदान झाले.
सकाळी ८ वा. अकलाई विद्यालयाच्या प्रभाग ५ मधील मतदान यंत्र बंद पडले. ते ८ वा. ५५ मिनीटापर्यंत बंद होते. त्यानंतर नवीन मतदान यंत्र आल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली तर दुपारी ३.३० वा. कर्मवीर बाबासाहेब माने पाटील सांस्कृतिक भवनाच्या प्रभाग क्र. ५ ब मध्ये भाजपाचे उमेदवार अंकिता पाटोळे यांचे पती (उमेदवार प्रतिनिधी) अंबादास पाटोळे यांनी मतदान यंत्राचे बटन बंद पडते, म्हणून मशीन आपटले असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार क्रांतिसिंह माने पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली असता त्यावर पोलिसांनी अंबादास पाटोळे यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु केले. या दोन घटना वगळता उर्वरित ११ प्रभागात मतदान सुरळीत पार पडले. प्रभाग क्र. ५ ब मधील १ तास बंद पडलेल मतदान यंत्र नवीन यंत्र १ तासाने
सुरु झाल्याने मतदान वेळेत १ तास वाढीव करण्यात आला.
चौकट
अकलुज नगरपरिषदेच्या मंगळवारी झालेल्या ३४ हजार ४०८ मतदानात सकाळी ७.३० ते ९.३० या पहिल्या २ तासात २९०० मतदान ८.५९ टक्के, ९.३० ते ११.३० या २ तासात ४८८२ मतदान १४.३३ टक्के, ११.३० ते १.३० या २ तासात ५४७९ मतदान १६.११ टक्के, १.३० ते ३.३० या २ तासात ४९६७ मतदान १४.३९ टक्के व ३.३० ते ५.३० या शेवटच्या २ तासात १५.८३ टक्के मतदान झाले.

0 Comments