Hot Posts

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे–मरीआई चौक रेल्वे पूल पाडकामापूर्वी वाहतूक आराखड्याचा आढावा

 अण्णाभाऊ साठे–मरीआई चौक रेल्वे पूल पाडकामापूर्वी वाहतूक आराखड्याचा आढावा 







सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अण्णाभाऊ साठे भैय्या चौक ते मरीआई चौक येथील रेल्वे पूल 14 डिसेंबर 2025 रोजी पाडण्यात येणार असून या कामामुळे 1 ते 1.5 लाख नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गांची आखणी व नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींचा आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली.

बैठकीदरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, “पूल पाडकामाच्या दरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पर्यायी मार्ग व्यवस्थित, सुरक्षित आणि व्यवहारी असावा.”

यासाठी त्यांनी पुढील पर्यायी मार्ग सुचवला:
मरीआई चौक → नागनाथ मंदिर मार्ग → रेल्वे स्टेशन आवारातील मागील रस्ता → इराण्णा वस्ती → मोदी अंडरपास → मोदी पोलिस चौकी.

प्रशासनाने या मार्गाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक नियोजन करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीनंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी रेल्वे व महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पर्यायी मार्गाची पाहणी केली. मार्गावरील अडथळे, गर्दीचे ठिकाणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

या बैठकीस सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, सामाजिक कार्यकर्ते माऊली पवार, माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, नगर अभियंता सारिका अकुलवार आदी उपस्थित होते.
 

Reactions

Post a Comment

0 Comments