सत्ताधारी हे बहिरे आहेत त्यांना " शिट्टी" च्या आवाजाने जागे करण्याची वेळ आली आहे "- आ. अभिजीत पाटील
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपालिकेतील गेली 30-40 वर्ष विकास कामाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करण्यात मग्न असलेले हे सत्ताधारी सर्वसामान्यांच्या आणि अडचणी समस्या या त्यांना ऐकू येत नाहीत. अशा या बहिर्या सत्याधाऱ्यांना शिट्टीच्या आवाजाने जागे करण्याची वेळ आली आहे.
माढा तालुक्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या प्रचार शुभारंभाच्याप्रसंगी नामदेव पायरी या ठिकाणी आवाहन करत या सत्ताधाऱ्यांना घरी बसून याची वेळ आली आहे. असे त्यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणांमधून आपले मनोगत व्यक्त केले.
पंढरपूर हे आता धुळपूर म्हणून ओळखले जात आहे. या शहरातील साधी धूळ कमी करू शकले नाहीत. त्याचप्रमाणे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदारी जोपासणाऱ्या मंडळींना मोठे करणारे सत्ताधारी आता विकासाच्या गप्पा मारू लागले आहेत. सर्वसामान्य मतदार बंधू-भगिनींना या सत्ताधारींच्या भूलथापांना बळी न पडता त्यांनी श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीच्या सर्व प्रभागातील उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावे. असे आवाहन देखील आमदार अभिजीत आबा पाटील यांनी केले.

0 Comments