Hot Posts

6/recent/ticker-posts

नळ जोडणीचे अर्ज केराच्या टोपलीत नागरिकांचे हाल

 नळ जोडणीचे अर्ज केराच्या टोपलीत नागरिकांचे हाल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिकेच्या साधू वासवानी झोन कार्यालयातील अभियंत्यांनी नळ जोडणी साठी दाखल झालेले 200 हून अधिक अर्ज दंड होण्याच्या भीतीमुळे फेटाळून लावले आहेत. जुळे सोलापूर, कल्याणनगर, भारती विद्यापीठ या परिसरातील रहिवाशींनी नळ जोडणी साठी ऑनलाईन अर्ज केले होते  हे सर्व प्रकरणे मंजूर न झाल्याने या अर्जाचा पाठपुरावा करणाऱ्या नागरिकांनी गुरुवार आणि शुक्रवारी या दोन दिवसात झोन कार्यालयात गोंधळ घातला. यावेळी अर्जामध्ये त्रुटी होत्या, अर्जदार जागेवर हजर नव्हते अशी कारणे देत अर्ज फेटाळण्यात आल्याचे सांगितले. परंतु याबाबत आम्हाला काहीही सांगण्यात आले नाही असे सांगत नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी विविध प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे. आपल्यावरही कारवाई होईल या भीतीने कट रचत विनाकारण हे अर्ज फेटाळल्याचे दाखवण्याचा प्रताप केल्याची चर्चा सुरू आहे.या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments