हरिदास रणदिवे यांची नियुक्ती
कुर्डुवाडी(कटूसत्य वृत्त):- अरण येथील हरिदास रणदिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी राज्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नियुक्ती केली आहे.
गोविंदबाग बारामती येथे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी रणदिवे यांना राज्य सरचिटणीस निवडीचे
पत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट करणार असल्याचा निर्धार रणदिवे यांनी यावेळी व्यक्त केला. निवडीबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील बोरगावकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, भारत आबा शिंदे यांनीही रणदिवे यांचे अभिनंदन केले.

0 Comments