Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ञांचे शेतकऱ्यांना व कृषीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

 राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ञांचे शेतकऱ्यांना व कृषीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


माढा (कटूसत्य वृत्त):- उपळवटे (ता. माढा) येथे कृषीनिष्ठ परिवार चे प्रमुख नितीन बापू कापसे यांच्यावतीने  दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी व कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कृषी महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय सत्र विद्यार्थी तसेच परिसरामधील द्राक्ष उत्पादकांनी उपस्थित राहून नवीन संशोधन, हवामान बदल, मृदा आरोग्य आणि आधुनिक बाग व्यवस्थापनावरील मौल्यवान माहितीचा लाभ घेतला.

शिबिराचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. आर. जी. सोमकुंवर, माजी संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे आणि डॉ. अजयकुमार उपाध्याय, प्रमुख शास्त्रज्ञ (मृदा विभाग), राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी शेतकऱ्यांशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी द्राक्ष बागेतील हवामान बदलाचे परिणाम, कार्बन सेवाक्षमता, मृदेमधील सूक्ष्मजीविक विविधता, निर्यातक्षम गुणवत्ता आणि स्मार्ट शेती तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 
 प्रास्ताविक निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले व 
कृषीनिष्ठ परिवार माढा तर्फे आयोजक नितिन कापसे सर्व शेतकऱ्यांचे तसेच तज्ज्ञांचे व कृषी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Reactions

Post a Comment

0 Comments