आम्ही मोहोळचा सर्वांगीण विकास करत आलो आहोत आणि ते केवळ राजकारण म्हणून टीका करत आले आहेत : राजन पाटील
यापुढील काळातील गतिमान विकासासाठी भाजपच्या उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करा
ज्येष्ठ भाजप नेते राजन पाटील यांचे मोहोळ मधील सभेत आवाहन
माजी आमदार यशवंत माने यांनीही मनोगतातून भाजप सोबत राहण्याचे केले आवाहन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
ग्रामपंचायत कालावधीपासून ते नगर परिषदेपर्यंत आणि नगर परिषदेच्या पहिल्या सत्तेपासून ते आजतागायत केवळ आणि केवळ मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही झटत आलो आहोत. मोहोळमधील गेल्या दहा वर्षाच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये निर्णयक्षम योगदान दिल्याचे कृतार्थ समाधान मनाला आहे. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री ना.जयकुमारभाऊ गोरे यांच्या सार्थ संकल्पनेतून जिल्ह्यात होत असलेल्या विकास प्रक्रियेमध्ये मोहोळचा देखील समावेश होणे आवश्यक आहे.त्यामुळे मोहोळ शहरातील सुजाण जनता यावेळी निश्चितपणे भारतीय जनता पक्षाची विचारधारा स्वीकारून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल सुशील क्षीरसागर यांच्यासह भाजपाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना कमळ चिन्ह समोरील बटन दाबून विजयी करून विकासाची महत्त्वपूर्ण संधी पुन्हा देईल असा विश्वास मोहोळचे माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी मोहोळ येथील प्रचार सभेत व्यक्त केला.
मोहोळ येथे भारतीय जनता पक्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शितल सुशील क्षीरसागर आणि अन्य भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये मार्गदर्शन करताना राजन पाटील बोलत होते यावेळी राजन पाटील यांनी टीका टीप नी टाळत विरोधकांवर उपहासात्मक भाषेत टीका करत भाजपासोबत राहून विकासाच्या मार्गावर वाटचाल करत राहण्याचे आवाहन शहरवासीयांना केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, माजी आमदार यशवंत माने, नागनाथ भाऊ क्षीरसागर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल क्षीरसागर,तालुकाध्यक्ष सतीश काळे निवडणूक प्रभारी सुशील भैया क्षीरसागर,सोमेश क्षीरसागर, सुरेश राऊत, संजीव खिलारे, प्रकाश चवरे,विकास वाघमारे रमेश माने यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार राजन पाटील म्हणाले की व्यक्तीद्वेषाने पछाडलेल्या विरोधकांना जी काय टीका टिप्पणी करायची ती करा, त्याला माझ्या शुभेच्छा राहतील. आणि याही पुढे त्यांनी याहीपेक्षा मोठ्या जोरात आमच्यावर टीका टिप्पण्या कराव्यात. आम्हाला टीका टिप्पणी करता येत नाही, कारण आमच्यावर संस्कार आहेत. त्यामुळे आम्ही टीका टिप्पणीमुळे नाराज होणार नाही. तुम्ही जितक्या टीका टिप्पण्या कराल, तेवढा आमचा उत्साह वाढणार आहे. तुमच्या टीका टिप्पण्या सदैव शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी फलदायी ठरतील अशा अशा शब्दात उपाहासात्मक टीका केली.
चौकट
मोहोळ शहरात गत नऊ वर्षात झालेला विकास जनता विसरू शकणार नाही. माझ्या आमदारकीच्या कालावधीत तब्बल ४२ कोटी रुपयांच्या योजनेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याबरोबर शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थापनाचे देखील मोठे काम होत आहे. त्यामुळे मोहोळ शहर हे पुढील पन्नास वर्षाच्या दृष्टीने विकासासाठी सज्ज होत असल्याचे समाधान वाटत आहे. या पुढील काळातही पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकासधारा अशीच अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर आणि भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करून विकासाची संधी द्यावी.
यशवंत माने
माजी आमदार मोहोळ

0 Comments