Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग नऊ मध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपच्या उमेदवार निलावती डोके विजयाच्या उंबरठ्यावर

 प्रभाग नऊ मध्ये प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपच्या उमेदवार निलावती डोके विजयाच्या उंबरठ्यावर




डोअर टू डोअर प्रचारात अभूतपूर्व यश मिळवत डोके परिवार ठरला प्रभागात सर्वाधिक मतदारापर्यंत पोहोचणारा परिवार 

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-


जसजसे मतदानाची तारीख जवळ येईल तसतसे प्रभाग क्रमांक ९ मधील भारतीय जनता पक्षाच्या बाजूने होत असलेली वातावरण निर्मिती आणखीनच सकारात्मक होताना दिसत आहे. या प्रभागातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या निलावती द्रोणाचार्य डोके यांच्या प्रचाराचा अंतिम टप्पा आता पूर्ण होत आला आहे. पदयात्रा त्याचबरोबर डोअर टू डोअर प्रचार, प्रभाग बैठका, कॉर्नर बैठका या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या या प्रभागातील पदाधिकाऱ्यांनी पूर्ण प्रभाग भाजपमय करून टाकला आहे. नीलावती डोके यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे त्यांचे सुपुत्र प्रवीणनाना डोके आणि प्रभाकरदादा डोके यांच्या समवेत राहुल डोके ,पोपट डोके, शहाजी डोके, राजाभाऊ डोके,विजय डोर्त्यांची मोठी साथ मिळाली आहे.

निलावती डोके या शिवसेनेचे यापूर्वीचे ज्येष्ठ नेते आणि आता भाजपमध्ये आलेले माजी उपसभापती बाळासाहेबभाऊ गायकवाड, यांच्या सख्ख्या भगीनी असून त्यांनी आपल्या बहिणीच्या विजयासाठी आपली संपूर्ण ताकद या प्रभागात पणाला लावली आहे. त्यांच्या परिवारातील विक्रांत गायकवाड आणि वैभव दाजी गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही निलावती डोके यांच्या प्रचारासाठी प्रभागना प्रभाग प्रचाराच्या निमित्ताने चाळून काढला आहे. त्यामुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात निलावती डोके यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने एकूणच डोके परिवाराच्या राजकीय सामर्थ्याचे पारडे जड होताना दिसत आहे.

चौकटके नागेश डोके,, प्रदिप डोके, गणेश डोके यांनी समर्थपणे सांभाळली आहे. या सर्वांना प्रभागातील स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यक
एकूणच या प्रचारामध्ये डोके परिवारात इतका ऊस्फुर्त प्रतिसाद अन्य कोणतेही उमेदवाराला मिळाला नाही हे संपूर्ण प्रभाग डोळ्याने पाहत आहे. प्रत्येकाला आपुलकीने बोलणे, त्यांच्याशी जिव्हाळ्याने संवाद साधत भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाची विचारधारा पटवून देण्यामध्ये डोके परिवाराने यश मिळवले.  विजय आता निश्चित मानला जात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भाऊगायकवाड, तालुकाध्यक्ष सतीशआप्पा काळे, निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर, यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागातील भाजपाचा प्रचार जोमाने सुरू असून अंतिम टप्प्यात कमळ चिन्हाने बाजी मारत विजय संपादित करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू ठेवली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments