Hot Posts

6/recent/ticker-posts

आता प्रभाग १० मध्ये अंतिम टप्प्यातील प्रचारात भाजपच्या प्रभावामुळे "नो रिस्क मेजर तानाजी मानेच फिक्स " वातावरण

 आता प्रभाग १० मध्ये अंतिम टप्प्यातील प्रचारात भाजपच्या प्रभावामुळे  "नो रिस्क मेजर तानाजी मानेच फिक्स " वातावरण




गाढवे -माने वस्ती परिसरासह प्रभागाच्या शहरी भागातही मतदारांना भाजपाने केले आपलेसे

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-


प्रभाग क्रमांक दहा मधील प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षांचे सर्वसाधरण प्रवर्गाचे उमेद्वार मेजर तानाजी माने यांच्या प्रचारामध्ये शेवटच्या टप्यात अभुतपुर्व गती आली असून प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत कमळ चिन्ह पोचविण्यामध्ये त्यांना यश मिळाले आहे. भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण यांच्या नियोजन आणि मार्गदर्शनाखाली मेजर तानाजी माने यांचे प्रचारार्थ त्यांचे सुपुत्र डॉ. किरण माने यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि समर्थकां समवेत प्रचार यंत्रणा सक्रीय ठेवली आहे. त्यामुळे आता प्रभाग १० मध्ये अंतिम टप्प्यातील प्रचारात भाजपच्या प्रभावामुळे  "नो रिस्क मेजर तानाजी मानेच फिक्स " वातावरण निर्माण झाले आहे.

सुरुवातीपासूनच प्रचाराची शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात धावपळ होताना दिसत नाही. सुरुवातीपासून पदयात्रा प्रभाग फेरी डोअर टू डोअर प्रचार प्रत्येक मतदारांना आपलेसे करून त्यांच्या समस्या जाणून घेणे यामध्ये मेजर तानाजी माने आणि त्यांच्या प्रचार टीमने यश मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे या प्रभागातील विविध कॉर्नर बैठकांना देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून या सर्व प्रतिसादामुळे प्रभागातील वातावरण भाजपमय होताना दिसत आहे. प्रत्येक घरापर्यंत कमळ पोचल्यामुळे आता मतदारांना देखील विकासासाठी कमळ ही बाब मनोमन पटली आहे. त्यामुळे मेजर तानाजी माने यांच्या विजयासाठी या प्रभागातले सर्वसामान्य जनताच अग्रेसर झाली असून या सर्व अनुकूल वातावरणामुळे मेजर तानाजी माने यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.

चौकट
 या प्रभागातील भाजपाची ताकद आणि मेजर तानाजी माने यांना उमेदवारी मिळाल्यामुळे झालेली सकारात्मकता या दोन्ही बाबींचा संयुक्त मेळ परफेक्ट झाल्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे भाजपाच्या दृष्टीने पॉझिटिव्ह फॅक्टर बनत मेजर तानाजी माने यांचे विजयाला बळ आले आहे. भाजपाच वरिष्ठ स्तरावरून विकास निधी खेचून आणत प्रभागाचा उर्वरित विकासाचा टप्पा पूर्ण करू शकतो. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि ज्येष्ठ नेते राजन पाटील प्रभागाला न्याय देऊ शकतात. त्यामुळे आता अन्य उमेदवाराला आपण प्रतिसाद दिला तर प्रभागाची अधोगती होईल या धारणेतून मतदारातील भाजपाची वोट बँक ठाम आहे. त्यामुळे आता काहीही झालं तरी पुन्हा भाजपलाच विजयी करून प्रभागाची विकासाची गंगा अविरतपणे सुरू ठेवण्याचा दृढ निश्चय मतदारांनी केल्याचे जाणवत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments