प्रभाग ४ मध्ये गत दहा वर्षातील विकासकामांमुळे शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख आणि दत्तात्रय खवळे यांचा विजय निश्चित
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात या प्रभागात भाजपाची विजयाच्या दिशेने मुसंडी
विकासात्मक वाटचाल अखंडीत सुरू ठेवण्यासाठी कमळ चिन्हाला सर्वाधिक प्रतिसाद
मोहोळ (साहिल शेख):-
मोहोळ शहराच्या पूर्व भागातील सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून अल्पावधीतच ओळख मिळवलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच चाणाक्ष रणनीती आखली आहे. हा प्रभाग ज्येष्ठ भाजप नेते माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, शहराचे ज्येष्ठ नेते शहाजान शेख, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांचे नेतृत्वाखाली सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने आगेकूच करणारा प्रभाग म्हणून संपूर्ण शहरभर परिचित आहे. विकासाच्या पाठीशी राहणारा प्रभाग म्हणून संपूर्ण शहरात या प्रभागाची ओळख असून मोहोळ शहरातील सर्वांगीण विकास पहायचा झाल्यास प्रभाग क्रमांक चारकडे पाहिले जाते. याचे संपूर्ण श्रेय या प्रभागाचे यापूर्वीचे नगरसेवक मुस्ताकभाई शेख आणि दत्तात्रय अण्णा खवळे यांनाच प्रभागवासीय देतात.
या प्रभागातून यापूर्वीचे नगरसेवक दत्ताअण्णा खवळे आणि शाहिस्ता परवीन मुस्ताकभाई शेख निवडणूक लढवत आहेत. दोघाही उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. यांच्या प्रचाराला प्रभागात मोठा प्रतिसाद मिळाला. कारण यापूर्वी मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्यामुळे विरोधकांना कोणत्या मुद्द्यावर मत मागावे हे सूचेनासे झाले आहे. त्यामुळे या प्रभागातील पारडे जड झाल्यामुळे दत्तात्रयअण्णा खवळे आणि शाहिस्ता प्रवीण मुस्ताक अहमद शेख यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या प्रभागात विकासासाठी मत म्हणजे कमळाला मत ही बाब पटवून दिली जात असल्यामुळे या प्रभागावर भाजपाचा झेंडा फडकणार अशी खात्री पदाधिकाऱ्यांना झाली आहे.
चौकट
दत्तात्रय अण्णा खवळे यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून प्रभागाची विकासात्मक सेवा केली आहे. शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख या यापूर्वीचे नगरसेवक मुस्ताकभाई शेख यांच्या सुविद्य पत्नी आहेत. मुस्ताक शेख यांच्या परिवारातील या उमेदवारीमुळे आणि त्यांना दत्ताअण्णा खवळे यांची खंबीर साथ असल्यामुळे या प्रभागाचा हा अभेद्य बालेकिल्ला सहजासहजी भेदने अन्य पक्षांना शक्य नाही. केवळ व्यक्तीद्वेषाने या दोन्ही कार्यक्षम आणि कौतुकास्पद कामगिरी असणाऱ्या नगरसेवकांना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना यश मिळताना दिसून येत नाही. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून प्रभागाच्या विकासाला मारक ठरणारी हेव्यादाव्याची आणि आकसभावनेची रणनीती देखील विरोधकाकडून सुरू आहे मात्र प्रभागातील जनता त्यांच्या भूलथापांना बळी न पडता खंबीरपणे दत्तात्रयअण्णा खवळे आणि शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.


0 Comments