Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य व सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
    यावेळी क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश अप्पा पाटोळे, यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी युवक प्रदेश कार्याध्यक्ष गोविंद कांबळे, युवा नेते प्रवीण वाडे, रोहित खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी सुरेश पाटोळे यांनी अभिवादन पर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक परिवर्तन घडवून आणले. म्हणूनच ते आम्हा कोट्यवधी जनतेचे “उद्धारकर्ते” आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन आज आम्ही पुढे जात आहोत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही भरलेली नाही. बाबासाहेबांनी  अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली. माणसामाणसातील भेद दूर करण्यासाठी देशाला संविधान दिले. केवळ अस्पृश्य समाजाचाच नव्हे, तर संपूर्ण भारतीय समाजाचा उद्धार त्यांनी संविधान लिहून केला आहे."
 
Reactions

Post a Comment

0 Comments