मोशन एज्युकेशनतर्फे रविवारी "स्कोअर मोअर वर्कशॉप" - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 13, 2025

मोशन एज्युकेशनतर्फे रविवारी "स्कोअर मोअर वर्कशॉप"

 मोशन एज्युकेशनतर्फे रविवारी "स्कोअर मोअर वर्कशॉप"





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोटा येथील सुप्रसिद्ध मोशन एज्युकेशन आता सोलापूरमध्ये कार्यरत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचे शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष उपक्रम  राबवित आहे. याअंतर्गत 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कोअर मोअर वर्कशॉप हा उपक्रम रविवार, दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता रंगभवन सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मोशन एज्युकेशन यांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत दिली.
           या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना 10 वी बोर्ड परीक्षेत 9० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देणे हा आहे.या वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण कौशल्यांवर तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.यामध्ये अभ्यासातील एकाग्रता व फोकस वाढवण्याचे तंत्र, स्मार्ट रिव्हिजन पद्धती,परीक्षेदरम्यान वेळेचे योग्य नियोजन उच्च दर्जाची उत्तरलेखन शैली, गुण मिळवण्यासाठी उपयुक्त परीक्षा स्ट्रॅटेजी व टिप्स याचा समावेश आहे.कार्यक्रमात पुण्यातील प्रख्यात Mind Power आणि Personality Development Coach डॉ. विजयकुमार काळे हे मार्गदर्शन करणार आहेत. सोलापूरमधील विद्यार्थ्यांना कोटा पॅटर्नचे शैक्षणिक मार्गदर्शन मिळावे, तसेच विविध परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळावे यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल असे मत मोशन सोलापूर टीम आणि संचालक यांनी व्यक्त केले
     अधिक माहितीसाठी  9766646400, 7822097296 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages