भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने यशवंत आंबेडकर यांची जयंती साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय बौद्ध महासभा सोलापूर शाखेच्या वतीने सूर्यपुत्र यशवंत (भैय्यासाहेब) आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम भंते बी सारीपुत्त यांच्या मंगल उपस्थितीत पार पडला.
न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर महाराष्ट्र संघटक शारदा गजभिये यांनी व्याख्यान दिले. सोलापूर जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे म्हणाले, यशवंत आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे नेत, बौद्ध चळवळ आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांसारख्या संस्थांमार्फत समाजाला संघटित केले. धम्मकार्यात स्वतःला झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार केला, राजकीय पदांपेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले.
यावेळी मीनाक्षी बनसोडे, विक्रांत गायकवाड यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन नागसेन माने यांनी केले. या कार्यक्रमास राजेंद्र माने, समता सैनिक दलाचे बाबू रणखांबे, रमा ढावरे , मंगल सूर्यवंशी, मंगल दोड्यानुर ,आम्रपाली सर्वगोड ,रमा शिवशरण, राजू सरवदे , मिलिंद सूर्यवंशी, देविदास लंकेश्वर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments