Hot Posts

6/recent/ticker-posts

टीईटीबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी

 टीईटीबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी




मनसे शिक्षक सेनेचा मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना घेराव घालण्याचा इशारा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- टीईटी संबंधित काही मुद्द्यांबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी अन्यथा मनसे शिक्षक सेनेतर्फे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना घेरण्यात येईल, असा इशारा मनसे शिक्षक सेनेचे प्रदेश सरचिटणीस जयवंत हक्के यांनी पत्रकार परिषदेत दिला.
          उच्च न्यायालयाच्या दि.1 सप्टेंबर 2025 रोजीच्या निर्णयाद्वारे पाच वर्षे सेवा राहिलेल्या शिक्षकांव्यतरिक्त सर्व शिक्षकांना त्यांच्या सेवेमध्ये दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण अनिवार्य करण्यात आले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवेतून कमी अथवा स्वेच्छा निवृत्ती घ्यावी, असा निर्णय दिलेला आहे. तथापि ज्या शिक्षकांची सेवा ५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ शिल्लक आहे, त्यांना या टीईटी अटीतून वगळण्यात आले आहे. मात्र अशा शिक्षकांना जर पदोन्नती हवी असेल तर त्यांनाही टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल.
         सेवेत टिकून राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. यावर राज्य शासनाने आजपर्यंत कोणतीच भूमिका घेतली नाही.  
 टीईटीसंदर्भात आरटीई कायदा आणि महाराष्ट्र शासनाचे सर्व शासन निर्णय लागू असताना १ सप्टेंबर २०२५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्य शासनाने अद्यापपर्यंत कोणतीच भूमिका स्पष्ट न केल्याने राज्यातील लाखो शिक्षकांवर संकट निर्माण झाले आहे.
म्हणून शासनाने आपली भूमिका वेळेत स्पष्टपणे जाहीर करावी अन्यथा मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना मनसे शिक्षक सेना घेरणार आहे, असे हक्के यांनी सांगितले.
          या पत्रकार परिषदेस संघटनेचे शहराध्यक्ष वीरसंगप्पा भोज, शशिकांत तोळनुरे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments